कडाक्याच्या थंडीने आरोग्यावर परिणाम;


Last Updated on January 5, 2023 by Vaibhav

नांदगाव : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहर व तालुक्यात वातावरणात अचानक बदल होऊन पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीने चांगलाच कडाका वाढल्याने पिकांना लाभदायक तर लहान मुले व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत.

नांदगांव तालुक्यात तापमानाचा पाराही खाली घसरल्याने सर्वांनाच हुडहुडी भरली आहे. गेल्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात थंडी जाणवत होती. परंतु दोन दिवसापासून थंडीचा प्रभाव अधिक जाणवत असल्याने शहर व तालुक्यात ठिकठिकाणी रात्री व पहाटेच्या वेळी शेकोट्या पेटत आहेत. त्यामुळे सकाळी शेतात लवकर कामाला जाण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या घटत असून उशिरा कामाला सुरुवात होते. या बोचऱ्या थंडीमुळे दिवसाची सुरुवात उशिराने होऊ लागली आहे.

शहरातील उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी झुंबड उड्डू लागली आहे.. सकाळ, सायंकाळच नव्हे, तर दिवसभरही थंडीचा प्रभाव कायम राहत असल्याने गारव्यापासून संरक्षणासाठी गरम कपड्यांची खरेदी होऊ लागली आहे. तसेच सध्या रब्बी हंगामात वाढलेली थंडी पिकांना लाभदायक ठरत असल्याने, शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

हेही वाचा: गर्भधारणापूर्व आरोग्यसेवेला प्रारंभ