Last Updated on December 22, 2022 by Vaibhav
जयपूर : मुहाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी ही महिला जवळच्या मोकळ्या मैदानात शौचास गेली असता, दोन नराधमांनी महिलेचा गळादाबून तिच्या तोंडात कापडाचा बोळा भरून बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर महिलेला तिथेच टाकून दोन्ही नराधम पळून गेले. घटनेनंतर महिलेला सतत रक्तस्राव सुरू झाला. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले, मात्र आरोपींचा सुगावा लागला नाही.
पोलिस म्हणाले….
पोलिसांनी सांगितले की, ही महिला एका कारखान्यात काम करत असून, तीन मुलांसह पतीपासून वेगळी राहते. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता घरात पाणी नसल्याने ती उघड्यावर शौचास गेली असता दोन तरुणांनी तिला पकडून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा: 50 कोटींचा पुस्तक घोटाळा