summer onion: उन्हाळ कांद्याने बिघडले बळीराजाचे अर्थचक्र


Last Updated on December 4, 2022 by Piyush

नाशिक: जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा. या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र (economic cycle) अवलंबून असते पण आठ महिने उन्हाळ कांदा (summer onion) साठवणूक करुन ही त्यातून चार पैसे पदरात पडत नसेल तर कांदा साठवणूक करायची कशाला ? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. (financial cycle is spoiled by summer onions)

कारण सुरुवातीला एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा काढला त्यावेळेसही शेतकऱ्यांना हाच दर मिळत होता, आणि आता आठ महिने कांदा साठवण करूनही वजनात घट, सडण्याचे प्रमाण, यामुळे ३० ते ४० टक्के घट येऊनही शेतकऱ्यांची पाहिजे अशी फडताळ बसत नसल्याने उन्हाळ कांदा साठवणूक करून शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून साठवून ठेवलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मध्यंतरी 3000 वर गेलेला कांदा आठ महिन्यांपासून चाळीत ठेवूनही शेतकऱ्यांना ६०० ते ७०० दराने विकावा लागत आहे. शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्यात मोठ्या प्रमाणात घट, सडण्याचे प्रमाण, मोड येण्याचे प्रमाण, यामुळे मोठ्या प्रमाणात घट येत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडल्याने पुढील रब्बी लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बळीराजाचा संकटांशी सामना

कांदा पिकाला दिवसेंदिवस अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने, वातावरणातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे लाल कांदा लागवड उशिरा झाल्या पर्यायाने चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्यातून चार पैसे पदरात पडतील अशी आशा शेतकऱ्यांनी होती, पण केंद्राच्या धोरणामुळे संभ्रमात सापडलेल्या शेतकऱ्यांचा कांदा मात्र भरडला गेला व आहे त्या भावात शेतकऱ्यांना उन्हाळ कांदा विक्री करावा लागत आहे.

रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता

शेतकयांनी साडेतीन महिन्यापूर्वी लागवड केलेला लाल कांदा बाजारात येऊ लागल्याने त्याला पंधराशे ते दोन हजार दर मिळत आहे, उन्हाळ कांदा शेतकऱ्यांनी टिकवून धरला पण कांदा टिकून ही त्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडल्याने रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासकीय अनुदानातून चाळीची उभारणी

शासनाने शेतकऱ्यांना कांदा चाळी उभारण्यासाठी अनुदान दिले याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा चाळीची उभारणी केली, पण हाच कांदा आठ महिने चाळीत ठेवूनही तोट्यावर विकावा लागत असेल, त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या कांदा साठवणूक वर होणार आहे. पुढील पिके उभे करण्यासाठी आहे त्या भावाने कांदा विकावा लागत आहे.

भाववाढीच्या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली, पण आता उन्हाळ कांदा अंतिम टप्प्यात असून दिवसेंदिवस कांदा खराब होत असून तीन हजारावर गेलेला उन्हाळ कांदा सरासरी ६०० ते ७०० रुपये भावाने विकला जात आहे, पण आठ महिने साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात वजनात घट, सडण्याचे प्रमाण, मोड येण्याचे प्रमाण, यामुळे भाव परवडणारा नाही. – रामदास शिंदे, कांदा उत्पादक.

वाचा : आजचे कांदा बाजार भाव; Onion Rates Today 03/12/2022