पुणे : उपवासासाठी लागणाऱ्या भगरीचा नवीन हंगाम चालू मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात तब्बल २० ते २५ टक्क्यांनी घट होईल असा अंदाज आहे. यंदा अवेळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रति क्विंटलमागे भगरीच्या भावात तब्बल आठशे ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.
सध्या कच्च्या मालाची आवक छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिसा, कर्नाटक, तमिळनाडूमधून नाशिकमधील मिलमध्ये होते. त्या ठिकाणी प्रक्रिया होऊन देशात सर्वत्र भगर विक्रीस पाठविली जाते. मात्र, उत्पादनात घट झाली असल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच भावात तब्बल ८०० ते १ हजार रुपये इतकी भाववाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांची तुलना केल्यास प्रत्येक वर्षी भगरीच्या भावात वाढ झाली आहे.
भगरीचे सेवन हे उपवासादिवशी केले जाते. मात्र, बद्री मध्ये असणारे घटक लक्षात घेतले असता ती केवळ उपवासापुरती मर्यादित न ठेवता इतर वेळेस पण खाण्यासाठी किती उपयुक्त आहे हे लक्षात येईल.
भगरीमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असतात. तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यांपेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात. जास्त प्रमाणात प्रोटिन असतात. भगरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात. आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हायला फायबरची गरज असते. म्हणूनच आहारात फायबरचे प्रमाण जास्त असते. भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते. तसेच व्हिटॅमिन सी, ए आणि ई जास्त प्रमाणात असतात. तसेच भगरीत खनिजेसुद्धा जास्त प्रमाणात आढळतात. साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.
भगरीच्या उत्पादनात घट झाली असून सन २०१९ मध्ये ६५०० ते ७ हजार रुपये क्विंटल भाव होता. २०२० मध्ये साडेसात हजार ते आठ हजार रुपये आणि २०२१ या वर्षभरात साडेसात ते आठ हजार रुपये आणि २०२१ च्या अखेरीस दहा ते साडेदहा हजार रुपये प्रति क्विंटलला भाव होता. – आशिष दुगड, भगरीचे घाऊक व्यापारी
कपड्यांची चमक कायम राखण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स