Cotton Farmer: भाववाढीकडे लागले उत्पादकांचे डोळे, कापूस येत नसल्याने व्यापारी हताश


Last Updated on November 29, 2022 by Piyush

जळगाव : कापसाला मुहूर्तावर निघालेला ११ ते १२ हजारांचा भाव, (cotton price) गेल्यावर्षी मिळालेल्या १२ ते १३ हजारांच्या भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (cotton farmers) चांगल्या भावाची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी कापूस विकत नसल्याने व्यापारी हताश झाले आहेत. दुसरीकडे कापूस उत्पादक शेतकरी गेल्या वर्षीप्रमाणे चांगल्या भावाची वाट पाहत आहे.

गेल्यावर्षी कापसाला चांगला भाव मिळाला. मात्र, ठरावीक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. इतर शेतकऱ्यांनी कापूस लवकर विकल्यामुळे भाव कमी मिळाला. यावर्षी कजगाव परिसरात मुहूर्तावर ११ ते १२ हजार रुपये भाव काढण्यात आला.

जिल्ह्यात इतर ठिकाणी भाव १२ हजारच्या पुढे निघाल्याने भाववाढीची आशा प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लागली. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस घरातच भरून ठेवला आहे.

दोन वर्षांत ५ ते ६ हजार रुपये भाव असलेल्या कापसाने गेल्यावर्षी चांगलीच उसळी मारली. तब्बल १२ ते १३ हजार रुपयांपर्यंत हा भाव गेला होता. मात्र, हा भाव ठरावीक शेतकऱ्यांना मिळाला. याचा खरा फायदा आर्थिक सक्षम असलेल्या शेतकऱ्यांना झाला. कारण भाववाढीच्या अपेक्षेवर हे कापूस उत्पादक शेतकरी आपला कापूस संक्रातीनंतरच म्हणजे १४ जानेवारीनंतर विकतात. त्याचाच खरा फायदा या शेतकऱ्यांना झाला आणि १२ ते १३ हजारांचा भाव मिळाला.

गेल्या वर्षी कपाशीच्या वाढलेल्या भावामुळे यावर्षी 90% शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मका बाजरी ज्वारी सह इतर पिकांचा पेरागटला सर्वदूर कपाशी लागवड करण्यात आली.

कापूस उत्पादक भाव वाढीच्या प्रतीक्षेत

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पांढरं सोनं घरात साठवून ठेवलेलं आहे. यावर्षी कापसाचे उत्पादन कमी असल्यामुळे कापसाला प्रतिक्विटल १३ ते १४ हजारांपर्यंत भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापूस पिकासाठी लागणारा खर्च व सध्या मिळणारा ८ हजारांचा भाव या दोन्ही बाबी पाहता शेतकऱ्यांना हा भाव परवडणारा नाही, असे बोलले जाते. कमीत कमी १० हजार किया त्यापेक्षा अधिक भाव पांढऱ्या सोन्याला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सध्या कापसाला ८ हजार ७०० ते ८०० पर्यंत भाव दिला जात आहे. मात्र, शेतकरी अजूनही माल विक्रीला देत नाही. बहुतांश शेतकयांनी आपली कपाशी घरात साठवून ठेवली आहे. नवीन वर्षात २०२३ मध्ये कपाशीच्या भावात वाढ होऊन १३ ते १४ हजारापर्यंत भाव मिळतील. असा अंदाज शेतकऱ्यांच्या गोटातून व्यक्त केला जात आहे.

आशेवर फेरले पाणी

गिरणा परिसरात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. कपाशीचे पिके डौलदार होती, नंतर पोळ्याच्या मोसमात पावसामुळे डौलदार असणारे कपाशीचे पीक कोमात गेल्यासारखे झाले होते. त्यात बरीच पिके वाया गेली. त्यानंतर पुढे कपाशी वेचणीला सुरुवात झाली.

शेतकऱ्यांनी उरली सुरली कपाशी वेचली. कपाशीला चांगला भाव मिळेल, अशी आशा होती. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी जादा भावाचे गाजर दाखविले. मात्र कपाशीला चांगला भावच अजून मिळाला नाही. कधी ७५०० ते ८५०० तर कधी ९ हजार ५०० असाच सध्याचा भाव दिसत आहे.

शेतकयांनी अजूनही कपाशी ३ विक्रीसाठी बाहेर काढली नसून १० हजारांच्यावर भाव जाईल, या आशेने शेतकरी वाट पाहताना दिसत आहे.

गरजेपुरती विक्री

सुरुवातीला आलेला . ओला कापूस शेतकऱ्यांनी वजन वाढत असल्याने विकला. त्यावेळी भावदेखील नऊ हजारच्या जवळपास होते तर काहींनी मुहूर्तावर जमलेला कापूस देत चांगला भाव घेतला. यानंतर कापूस ८ हजार

२०० वर येऊन ठेपला. पुन्हा त्यात वाढ होत भाव ८ हजार ७०० पर्यंत पोहचले खरे; मात्र बारा तेरा हजारच्या भावाची अपेक्षा असल्याने कापूस घरात भरला आहे. जेवढी गरज, तेवढाच कापूस विकण्यात येत आहे.

भाजीपाला दरात घसरण! टोमॅटोचे दर पुन्हा कोसळणार?