शेतकऱ्याची कमाल! कुसळही न उगवणाऱ्या माळरानावर केली सुमो वांग्याची शेती


Last Updated on November 24, 2022 by Piyush

सातारा: ज्या माळरानावर कुसळ उगवत नाही त्याच ठिकाणी वडोली निळेश्वर, ता. कराड येथील शेतकरी संजय पवार यांनी वीस गुंठे क्षेत्रावर सुमो वांग्याची बाग फुलवली असून, पाच टनाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

आपल्या शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळी पिके घेणाऱ्या पवार यांनी वीस गुंठे माळरानावर वेगळ्याच सुमो जातीच्या वांग्याची लागवड केली. त्यांचे तोडे सुरू झाले आहेत असून, मुंबई बाजारपेठेत दहा किलोला चारशे रुपये दर भेटत आहेत. साडेचार फुटी सरीवर त्यांनी सुमो वांग्याची ३ ऑगस्टला रोपांची लागण केली. ड्रीपद्वारे पाणी, औषधे, खते दिली जातात. आतापर्यंत वीस हजार रुपये उत्पादन खर्च आला आहे.

लागणीच्या पन्नास दिवासांनंतर पिकांचे तोडे सुरू झाले असून, पाच महिने तोडे सुरू राहणार आहेत. आतापर्यंत सातशे किलो वांग्याचा तोडा केला आहे. सुमो वांगे मोठे आणि वजनदार असल्याने इतर वांग्यांपेक्षा फायद्याचे ठरत आहे. मुंबई बाजारपेठेत या वांग्याला चांगली मागणी आहे.

बाजारपेठेत या वांग्याना दहा किलोला चारशे रुपये दर मिळत आहे. त्यातून अठ्ठावीस हजार रुपये मिळाले आहेत. पाच टन उत्पादन भेटेल अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे.

मी माळरानावर वीस गुंठे क्षेत्रावर सुमो वांग्याचे पीक घेतले असून, त्याचे उत्पादन चांगले निघत आहे. मोठ्या वांग्याला मागणी चांगली आहे. खर्च वजा करून एक लाख ऐशी हजार रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. – संजय पवार, शेतकरी वडोली निळेश्वर.

सुमो वांग्याचे वेगळेपण

इतर वांग्याच्या तुलनेत सुमो वांगे मोठे असते. हे वांगे आघारी म्हणून ओळखले जाते. इतर वांग्याचा आकार जेवढा लहान तेवढी मागणी जास्त असते.

सुमो वांग्याचा आकार जेवढा मोठा तेवढा त्याला मागणी जास्त. त्यामुळे वजन जास्त भरत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा जास्त. भरीत करण्यासाठी खरेदी करण्यासाठी जास्त मागणी असते.

मी माळरानावर वीस गुंठे क्षेत्रावर सुमो वांग्याचे पीक – घेतले असून, त्याचे उत्पादन चांगले निघत आहे. मोठ्या वांग्याला मागणी चांगली आहे. खर्च वजा करून एक लाख ऐशी हजार रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. – संजय पवार, शेतकरी वडोली निळेश्वर.

वाचा : शेती पंप वीजबिलांच्या सक्तवसुलीला स्थगिती; देवेंद्र फडणवीस यांचे आदेश