लाल कांद्याच्या दरात घसरण, पहा आजचे कांदा बाजारभाव


Last Updated on December 3, 2022 by Piyush

Today Onion Rate: तब्बल दोन महिने उशिरा आलेल्या लाल कांद्याचे दर घसरू लागल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. शुक्रवारी लाल कांद्याचे दर चार हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सद्य:स्थितीत नवीन लाल कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने उन्हाळी कांद्याच्या मागणीत घट आल्याचे सांगण्यात येते.

सद्यस्थितीत कांद्याचे दर गडगडलेले आहेत. कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत कांद्याचा सरासरी दर प्रतिक्विंटल १ हजार २०० रुपये इतका आहे.

शुक्रवारी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड, राहुरी, अहमदनगर, लातूर, विजयपूर, गुलबर्गा, लासलगाव या परिसरातून २१० ट्रक्समधून २१ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. दर प्रतिक्विंटलासाठी १०० रुपये ते ३ हजार रुपयांपर्यंत आहेत.

उच्च प्रतिच्या कांद्यास क्वचितच ३ हजाराचा दर मिळतो आहे. अन्यथा सरासरी प्रतिक्विंटल १ हजार ते १ हजार २०० रुपयांपर्यंतच कांद्याची विक्री होत आहे. कांदा उत्पादनास एकरी ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च होतो आहे. पण, दर कमी असल्याने लागवडीवर झालेला खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/12/2022
कोल्हापूरक्विंटल390670022001400
औरंगाबादक्विंटल17462001200700
धुळेलालक्विंटल408020020001600
लासलगावलालक्विंटल98125018001616
नागपूरलालक्विंटल180100020001750
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल385950022001350
पुणे- खडकीलोकलक्विंटल9100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल2663001200750
नागपूरपांढराक्विंटल100100020001750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल222030032452400
येवलाउन्हाळीक्विंटल35002001370750
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल15001501099800
लासलगावउन्हाळीक्विंटल379550015911100
मनमाडउन्हाळीक्विंटल20004001021700
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल716520017251150
वैजापूरउन्हाळीक्विंटल6141501200900

वाचा : उद्योगासाठी बेरोजगार तरुणांना मिळणार आता 15 लाख कर्ज