Last updated on January 10th, 2022 at 12:40 pm
यवतमाळ : उपचाराच्या नावाखाली अत्याचार करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली होती. दरम्यान शनिवारी या डॉक्टरला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
गणेश मुरलीधर साठे (३५) रा. छत्रपती सोसायटी, तीन फोटो चौक, उमरसरा असे डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टर उमरसरा परिसरात निसर्गोपचार केंद्र चालवितो. मधूमेहाचा त्रास असल्याने पीडित महिला २०१७ मध्ये डॉक्टरच्या नॅचरोपॅथी क्लिनिकमध्ये गेली. सलग १२ महिने उपचार घेतल्यानंतर आराम मिळेल, असे सांगितले. त्यामुळे पीडिता क्लिनिकमध्ये जाऊ लागली. यावेळी महिलेला गुंगीचे औषध देवून बेशूद्ध करण्यात येत होते.
या अवस्थेत डॉक्टरने वारंवार अत्याचार केला. व्हिडिओ काढले. याच व्हिडिओच्या आधारे सातत्याने शोषण सुरू केल्याची तक्रार अवधूतवाडी पोलीस स्टेशनला पीडितेने दिली. त्यावरून पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली. त्यानंतर डॉक्टरला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने डॉक्टरला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आतेभावानेच केला मामेभावाचा घात