आवक घटली तरी घसरण कायम! कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल


Last Updated on December 6, 2022 by Piyush

नाशिक : आवक कमी असून देखील कांद्याचे भाव (Onion prices) सतत कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या (farmer) डोळ्यात अक्षरशः पाणी उतरले आहे. गेल्या महिन्याभरापासून बाजारपेठेत कांद्याचे (onion market) भाव सातत्याने चढउतार सुरु आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत (Manmad Agricultural Produce Market Committee) गेल्या आठवड्यापेक्षा सोमवारी (दि.५) लाल ५०० तर उन्हाळी कांदा ३०० रुपयांनी भाव पडल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

मनमाड बाजारसमितीत सोमवारी (दि.५) कांद्याची अंदाजे ३५० वाहनाची आवक होती. गेल्या सप्ताहात असलेल्या भावापेक्षा कमी झाले. दिवसेदिवस जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याची आवक कमी होत आहे. त्यातच रोज भावही कमी मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातील नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.

साठवण केलेल्या कांद्याला अधिक भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. दिवाळीनंतर मात्र बाजारात कांद्याचा भाव वाढला होता. २००० ते २९०० रुपयांपर्यंत कांदा विकला गेला. मात्र काही भाव कमी होत गेले आणि त्या प्रमाणात आवकही घटली. दिवाळीनंतर तेजीत आलेल्या कांद्याच्या भावात गेल्या १५ दिवसांपासून घसरण सुरू आहे.

साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. आता हा कांदा संपू लागला आहे. आता नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. या महिनाभरातच कांद्याची सुमारे घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकयांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

एकतर हवामान साथ देत नाही. त्यात कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पावसाने पीक मातीमोल होते. जेव्हा पीक येते, तेव्हा भाव नसतो. आता तर माल असूनही त्याला भाव नाही. त्यामुळे जगायचे तरी कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

बाहेरच्या राज्यातही नवीन कांदा आल्याने आपल्याकडे भावात चढउतार होत आहे. तर जुन्या कांद्याला मागणी कमी आणि भावही कमी आहे. ग्राहक नवीन कांद्याला पसंती देतात. त्यामुळेच कांद्याची मागणी कमी असल्याने भाव कमी जास्त होत असून भविष्यात परिस्थिती सुधारेल. – चंद्रकांत विघ्ने, प्रशासक, मनमाड बाजार समिती.

कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/12/2022
कोल्हापूरक्विंटल500570020001200
औरंगाबादक्विंटल14281501400775
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल1138290018001350
साताराक्विंटल132100015001250
मंगळवेढाक्विंटल18520022001410
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल8030020001500
कराडहालवाक्विंटल15050018001800
सोलापूरलालक्विंटल3331710025001200
लासलगावलालक्विंटल109061122001840
जळगावलालक्विंटल60447515751025
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल450090021251700
नागपूरलालक्विंटल1900150020001875
संगमनेरलालक्विंटल143950025111506
साक्रीलालक्विंटल65454001100800
देवळालालक्विंटल5240020001765
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल639150030002250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल349930022001250
पुणेलोकलक्विंटल1000450015001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल26110015001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल180012001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल3373001400850
कल्याणलोकलक्विंटल3500700600
कामठीलोकलक्विंटल6120016001400
संगमनेरनं. १क्विंटल1337120015611380
शेवगावनं. १नग1730150025001500
कल्याणनं. १क्विंटल3150016001550
संगमनेरनं. २क्विंटल80290012001050
शेवगावनं. २नग207080012001200
कल्याणनं. २क्विंटल3100012001100
संगमनेरनं. ३क्विंटल5005001000750
शेवगावनं. ३नग1442100700700
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल475050032302300
येवलाउन्हाळीक्विंटल50003001501700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल20003001167750
नाशिकउन्हाळीक्विंटल128835013301000
लासलगावउन्हाळीक्विंटल68185001252970
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल10000200950700
कळवणउन्हाळीक्विंटल143001001500850
चांदवडउन्हाळीक्विंटल32003811270750
मनमाडउन्हाळीक्विंटल4500300900750
सटाणाउन्हाळीक्विंटल93101751195700
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल862560014201100
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल19504001125625
वैजापूरउन्हाळीक्विंटल8461501050850
देवळाउन्हाळीक्विंटल61531501005800
नामपूरउन्हाळीक्विंटल78601501120700
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल64651001110750

वाचा : संत्रा झाडे तोडून मरणाचे रचणार सरण, मुख्यमंत्र्यांना निवेदन