इलॉन मस्क द्विटरचे सीईओपद सोडणार, मूर्ख माणूस मिळाल्यावर देणार पदाचा राजीनामा


Last Updated on December 22, 2022 by Vaibhav

न्यूयॉर्क: ट्रिटर वापरकर्त्यांचा सल्ला मान्य करून द्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा लवकरच त्याग करण्याची तयारी इलॉन मस्क यांनी दर्शविली आहे. टर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी कंपनीचे सीईओ पद स्वत:कडे घेतले होते. दोनच दिवसांपूर्वी मस्क यांनी एक पोल ट्विटरवर लावला होता. ‘मी द्विटरचे सीईओ पद सोडावे का, असा प्रश्न त्यांनी या पोलमध्ये वापरकर्त्यांना विचारला होता. इलॉन मस्क यांच्या द्वीटमध्ये १.७ कोटी लोकांनी सहभाग घेतला. ५७.५ टक्के लोकांनी त्यांच्या विरोधात, तर ४२.५ टक्के लोकांनी त्यांच्या बाजूने मत नोंदविले.

मस्क म्हणाले….

मस्क यांनी एक द्वीट करून आपण राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले. त्यांनी म्हटले की, जितक्या लवकर मला द्विटरचे सीईओपद सांभाळण्यासाठी पुरेसा मूर्ख माणूस सापडेल, तितक्या लवकर मी पदाचा राजीनामा देईन. त्यानंतर मी केवळ सर्व्हर व सॉफ्टवेअरची टीम सांभाळेन

हेही वाचा: चीनमुळे भारत-अमेरिका मजूबत संबंध गरजेचे