Last Updated on December 27, 2022 by Vaibhav
डोळखांब : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायात अनेकदा तोटाच पदरी पडतो. गाव-खेड्यावर दुग्धव्यवसायास अनुकूल वातावरण असल्याने शहरातील नोकरी धंद्याच्या मागे न लागता तरुणांनी आता दुग्धव्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे. शासनाच्या अनेक अनुदानाच्या योजनाही उपलब्ध असल्याने या व्यवसायाला बरकत आली आहे.
शेती हाच महाराष्ट्रातील मुख्य व्यवसाय असून ग्रामीण भागातील कुटुंब शेतीवर अवलंबून असतात. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीही(agriculture) तोट्यात जाऊ लागल्याने पूरक व्यवसायाची गरज म्हणून पशुपालनाच्या व्यवसायाला महत्त्व आले आहे. सुरुवातीच्या काळात शेतीला(agriculture) दुग्धव्यवसाय हा जोडधंदा असेच स्वरूप होते. मात्र गेल्या काही दशकांत दुग्धव्यवसाय चांगलाच विस्तारला. शेतीला (agriculture)पूरक व्यवसाय म्हणून सुरू झालेला हा व्यवसाय आता खरे तर मुख्य व्यवसाय बनला आहे. खेडोपाडी आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनला आहे.
बेरोजगारी वाढल्याने शहापूर तालुक्यातील बहुतांश तरुण जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत. यंदा पाऊस(Rain) चांगला झाल्याने पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. त्यामुळे पशुपालकांतून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय वाढत आहे. यंदा जूनपासूनच तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने नदी, नाले, तलाव, विहिरींमध्ये चांगल्या प्रमाणात पाणी आहे… याशिवाय गेल्या दोन वर्षांच्या कालावधीतील कोविडच्या प्रादुर्भावामुळे शहरात कामानिमित्त गेलेले तरुणही गावी परतले आहेत, तेही या दुग्धव्यवसायात उतरले आहेत.
अनेक दुग्धउत्पादक शेतकऱ्यांकडे देशी म्हशींची पैदास मोठ्या प्रमाणात असली तरी आता नवीन व्यावसायिकांचा मात्र सुरती, मुन्हा, जाफराबादी, पंढरपुरी म्हैसाणा अशा संकरीत किंवा परराज्यातील म्हशी खरेदी करण्याकडे जास्त कल आहे. मागील महिन्यात लम्मीचा प्रादुर्भाव काही जनावरांना झाला होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते; परंतु आता रोगाचा प्रादुर्भाव राहिला नसल्याने तालुक्यात पशुधनाची संख्या वाढू लागली आहे.
हेही वाचा: दाण्याविना तुरीच्या शेंगा, शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ