काचेची बाटली बनवणारे यंत्र तुम्हाला माहित आहे? का या यंत्राचा शोध कोणी लावला


Last Updated on November 21, 2022 by Ajay

काचेची बाटली बनवणं एकेकाळी फार कौशल्याचं काम असे. वाळू, सिलिका, काचेचे तुकडे घेऊन काचेचा जो रस बनवला जात असे त्याच्यामध्ये फुंकर घालून त्याला एखाद्या फुग्यासारखा आकार द्यायचा आणि त्यातून काचेचे बल्ब बनायचे. त्याचप्रकारे बाटल्याही तयार केल्या जायच्या. हे प्रचंड कष्टाचं काम होतं. प्रामुख्याने स्वस्तात मिळतात, म्हणून बालमजूर या कामाला लावले जात, ज्यांचं शिक्षण पूर्ण होत नसे. काही थोडे काम हाताने आणि थोडे यंत्राने असं यंत्र आलं, पण तरीही काचेच्या बाटल्यांची जेवढी मागणी होती तेवढी पूर्ण करता येईल असं यंत्र तयार झाले नव्हते.

माईकेल ओवेन्स (१८५९ – १९२३) याने पहिल्यांदा संपूर्णपणे स्वयंचलित असा काचेची बाटली बनवण्याचा प्लांट टाकावा असे ठरवले. या धडपड्या संशोधकाने भरपूर मेहनतीने पश्चिम व्हर्जिनिया इथल्या ग्लास फॅक्टरीत काम करायला सुरू केले. त्याचबरोबर संशोधन सुरू केले. वयाच्या १० व्या वर्षापासून त्याने काम केले. त्यामुळे त्याला काच बनवण्याच्या सगळ्या कौशल्याची माहिती झाली. टोलेडो, ओहिओ इथे गेला, तेव्हा तिथले उद्योजक एडवर्ड लिबे यांनी त्याचे गुण हेरले. त्यांनी त्याला सेमी ऑटोमेटिक प्लांटची सुधारणा करणारा ऑटोमॅटिक प्लांट टाकायची परवानगी आणि पैसे दिले. १९०३ मध्ये संपूर्णपणे यंत्राने बनणारी काचेची बाटली त्याने बनवली. हेही वाचा: Adhesive Tape: कोणी केला चिकटपट्टी (Adhesive Tape) चा अविष्कार, जाणून घ्या