Steel Price: मागणी घटली, स्टीलच्या दरात 5 हजारांची घसरण


Last Updated on November 27, 2022 by Piyush

लोखंडाचे भाव: काही महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात स्टीलचे दर (Steel Price) ८० हजार रुपये टनापर्यंत गेल्याने बांधकाम व्यावसायिकांसह लघुउद्योजक संकटात सापडला होता. आता मात्र, स्टीलच्या दरात (Steel Price) सातत्याने घसरण होत आहे. सप्टेंबर महिन्यातपर्यंत दर ६१ ते ६३ रुपयांवर आले होती. आता त्यात आणखी घसरण झाली असून सध्या एक टन स्टीलचा भाव ५८ ते ५९ हजार रुपयांवर आला आहे. घटलेली मागणी, आयात कर आदी कारणांमुळे दरात घसरण झाल्याचे स्टील विक्रेत्यांनी सांगितले. (The price of a tonne of steel came to Rs 58,000 to 59,000)

कोरोनाच्या संकटात दोन वर्षे बांधकाम व्यवसाय थंडावला होता. मोठमोठे प्रकल्प बंद पडल्याने, कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा एकदा बांधकाम व्यवसाय झेप घेईल, अशी चिन्हे होती. परंतु, यंदा पावसाळा चांगलाच लांबल्याने, त्यांचा मोठा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला. सततच्या पावसामुळे अनेक बांधकाम प्रकल्प रखडले. याचा परिणाम घर बांधणीसाठी लागणाऱ्या स्टील अर्थात लोखंडी सळ्यांच्या उत्पादनावर झाला आहे.

मोठी गुंतवणूक करून काही स्टील उद्योजकांनी मागणीपूर्व काही दनांमध्ये उत्पादन करून त्याची साठवणूक केली होती. मात्र, याचा फारसा फायदा झाला नसल्याचे दिसून येत आहे. स्टीलची मागणीच घटल्याने, साठवणूक केलेले स्टील आता बेभाव विकण्याची वेळ स्टील उद्योजकांवर आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे स्टीलच्या दरात गत चार ते पाच महिन्यांपासून सातत्याने घसरण होत आहे.

कधीकाळी ४५ हजार टनांपर्यंत मिळणाऱ्या स्टीलमध्ये मोठी वाढ झाल्याने बांधकाम व्यावसायिकांना फटका बसला. अनेकांनी घरांच्या किमती वाढविल्या होत्या. आता स्टीलच्या दरात घसरण होत असल्याने घरांच्या किमती कमी होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

सिमेंटचे भाव वाढणार

सिमेंटच्या दरात गत काही दिवसांपासून वाढ होत आहे. ३५५ ते ३६५ रुपये असलेला भाव सध्या ३६० ते ३७० रुपयांवर पोहचला आहे. येत्या काही दिवसांत सिमेंटच्या दर ४० रुपयांने वाढणार असल्याचे विक्रेत्याने सांगितले. माती व सिमेंटच्या विटा, खडी, वाळूचे मात्र जैसे थे आहेत.

घरांच्या किमतीवर परिणाम नाही

स्टीलचे दर कमी होत असले तरी इतर बांधकाम साहित्याचे दर वाढतेच आहेत. त्यामुळे वाशिम शहरातील घरांच्या किमतीवर कोणताच परिणाम झाला नसून सद्या नवीन घरांचे दर जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.

स्टीलच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सध्या मागणी घटल्याचा हा परिणाम आहे. सिमेंटचे दर मात्र वाढत आहेत. पुढील काही दिवसांत स्टीलचे दर आणखी कमी होऊ शकतात, मात्र सिमेंटचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. – वीरेंद्र बागरेचा, स्टील विक्रेते.

वाचा : ट्रॅक्टर सबसिडी: खुशखबर..! आता 90 टक्के अनुदानावर मिळतो ट्रॅक्टर