लिंबू, संत्री, मोसंबीच्या दरात घटः बोरांची आवक वाढली


Last Updated on December 19, 2022 by Vaibhav

रविवारी (दि. १८) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस ४ ट्रक, संत्री २५ ते ३० टन, मोसंबी ३५ ते ४० टन, डाळिंब २० टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे सुमारे ४ हजार ते साडे चार हजार गोणी, पेरू १००० ते ११०० क्रेटस, कलिंगड ४० ते ५० गाड्या, खरबुज २० ते २५ गाड्या, बोरे २ हजार ५०० पोती तर सिताफळाची १८ ते २०टन इतकी आवक झाली. बोरोची आवक वाढल्याने दर कमी झाले तर लिंबू, संत्री, मोसंबीच्या भावातही घट झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : १००.२००, अननस ७०, २७०, मोसंबी : (३ डझन ) : ३२०-५५०, (४ डझन) : १४०-२८०, संत्रा : (१० किलो) : २००.६००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ५०.२५० गणेश : १०.६० आरक्ता ३०.९० कलिंगड : ५.१० खरबूज : १०.२२, पपई : ५, २० पेरू (२० किलो) : २५०.४००, चिक्कू (१० किलो) : ५०.४००, सिताफळ : १०, १००, बोरे (१० किलो) : चेकनट: ३८०-४२०, उमराण : ४०,५० चमेली : ९०.१२०, चण्यामण्या: ४३०.४६०

हेही वाचा: Cotton Farmer: शेतकरी भावांनो, थोडं थांबा ! ‘पॅनिक सेल’ करू नका