Last updated on January 10th, 2022 at 02:27 pm
जळगाव : कोरोनात चार मुलींचे आधारस्तंभ असलेल्या वडीलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुलींचे लग्न जमल्याने मुलीने स्वतःच्या लग्नात चक्क वडीलांचा पुतळा बनवून पुतळ्याला खुर्चीवर विराजमान करत आशीर्वाद घेतल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होत्याच नव्हते होऊन अनेक कुटूंबातील घरची सर्वजबाबदारी पेलणारा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब उध्वस्त झाले आहेत. अशाच प्रकारे तालुक्यातील नांद्रा येथील अनेक चांगले चांगले व्यक्तिमत्त्व अचानक हरपले. त्यामध्ये नांद्रा येथील चार मुलींचे आधारस्तंभ असणारे सदाचारी व नेहमी हसतमुख व्यक्तिमत्त्व माजी सैनिक भागवत पाटील यांचे देखील अनपेक्षित कोरोनात निधन झाले.
त्यांच्या चार मुलीं पैकी दोनच मुलींचे लग्न आधीच झाले असून दोन मुलींचे लग्न बाकी असतांना त्या कुटूंबावर मोठा आघात झाला. या कुटूंबावर नियतीने घाला घातला होता. भागवत पाटील यांचा एक जावाई आर्मीत व एक जावाई इंजानियर आहेत. त्यांनी घरातील मुलींची जवाबदारी पेलून त्या कुटूंबाला सावरले. कै. भागवत पाटील यांना तिसऱ्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात करायचे होते.
पण ते स्वप्न ते उराशीच घेऊन ते अचानक या कुटूंबातून निघून गेल्याने त्यांची स्मृती कायम •मुलींना आपल्या घरात दरवडावी व पप्पा आपल्यातच असल्याची जाणिव व्हावी म्हणून त्यांचा दोन लाख किंमतीचा खुर्चीवर बसलेला पुतळा बनविण्यात आला व मुलीने लग्नात त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेतला.
यावेळी मुलींच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. पप्पा त्यांच्या सोबतच असल्याची जाणिव यावेळी मुलींना झाली. याप्रसंगी आलेले सर्व नातेवाईक, वन्हऱ्हाडी यांचेही डोळे ही पाणावूण, खरच पप्पाच्या लाडल्या मुलीच असतात व मुलींचे पप्पांवरचे हे सर्व प्रेम पाहून सर्वांना गहिवरुन आले.
बाप रे! राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 नवे रुग्ण सापडले