संक्रांतीनंतर कापसाचे दर वाढणार! जिनिंग चालक संपावर जाणार?


Last Updated on December 14, 2022 by Piyush

Cotton Rate : सध्या कापसाचे प्रतिक्विंटल दर (Per quintal rate of cotton) आठ ते साडेआठ हजार आहेत. ते मकरसंक्रांतीपर्यंत (Makar Sankrant) तसेच राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी (Traders) वर्तविली. जिल्ह्यात कापसाची टंचाई (Cotton shortage) निर्माण झाल्याने जळगाव जिल्ह्यात केवळ ७५ जिनिंग प्रेसिंग मिल्स (Ginning Pressing Mills) सुरू आहेत. निम्म्याच जिनिंग सुरू असल्याने रोजचा खर्चही काढणे अवघड झाले आहे. यामुळे जिनिंग प्रेसिंग असोसिएशन (Ginning Pressing Association) पाच दिवसांच्या संपावर जाण्याची शक्यता आहे.

कापसाला 10 हजार ते 13 हजार असा दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी कमी आहे. त्याचवेळी गाठींचा भाव कमी असल्याने व्यापाऱ्यांना कापसाला दहा हजारही देता येत नसल्याचे चित्र आहे. मकर संक्रांतीपर्यंत हीच स्थिती राहणार असल्याचे संकेत आहेत. बाजारात कापसाची आवक थांबल्याने कापसाचा तुटवडा निर्माण झाल्याने जिनिंग व्यवसाय धोक्यात आला आहे.

कापसाच्या टंचाईमुळे जिनिंग व्यवसायासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जिनिंग केवळ एकाच पाळीत सुरू असते. यामुळे अपेक्षित गाठी तयार होत नाहीत. कारण जिनिंगमध्ये कापूसच येत नाही. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या गाठींची मागणी घटली आहे. यावर्षी कापसाचे अधिक उत्पादन झाले आहे.

कापासाला दहा ते तेरा हजाराचा दर मिळावा तरच कापुस बाजारात आणण्याची शेतकऱ्यांची भूमिका

व्यापारी कापसाचा दर्जा पाहून आठ ते साडेआठ हजार दर देत आहेत. कापसाला 10,000 ते 13,000 भाव मिळावा, त्याशिवाय कापूस बाजारात आणला जाणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांची आहे. कापसाची आवक घटली असल्याने कापसाशिवाय जिनिंगचे काम कसे होणार, असा प्रश्न आहे.

जिनिंगमधून 400 गाठी तयार होत असतील तर त्यांना केवळ दोनशे गाठींचाच कापूस उपलब्ध होत आहे. सर्व कारखान्यांची तीच अवस्था आहे. दरम्यान, चार-पाच दिवसांचा संप केल्यानंतर अचानक कापसाची आवक वाढणार आहे. त्यामुळे जिनिंग चालकांना जिनिंग चालविणे शक्य होणार आहे.

वाचा : केळी लावलीच नाही, त्यांनाही पीकविमा भरपाई!