Cotton Rate: पांढऱ्या सोन्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले


Last Updated on December 26, 2022 by Piyush

Cotton Rate: मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड झाली आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे कापूस पीक उत्पादनात कमालीची घट झाली. त्यातच घरात आलेल्या पांढऱ्या सोन्याचे भाव गडगडल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

यावेळेस अपेक्षित सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. मात्र, खरीप हंगामात वेळोवेळीच्या अतिवृष्टीमुळे कपाशीचे नुकसान ‘झाले. त्यानंतर कीड व विविध रोगांमुळे कापसाच्या सरासरी उत्पादनात घट झाली आहे. दोन ते तीन वेचणीत कापसाच्या पन्हाट्या होताच शेतकऱ्यांनी कापसाचे रान मोकळे करत हरभरा व गहू पेरणी केली. कापसाचे दर वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

👉 शेतकऱ्यांना कापूस विक्री थांबवून फायदा होणार का? जाणून घ्या एका क्लिक वर 👈

शेतकऱ्यांच्या घरातून कापूस व्यापाऱ्यांकडे गेला की भाव वाढतात, असा बळीराजाचा दरवर्षीचा अनुभव असल्याने शेतकऱ्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत घरातच भाव वाढतील, या आशेने कापसाची साठवणूक केली.

त्यामुळे बाजारात कापसाची आवकदेखील मंदावली आहे. सध्याच्या बाजारभावात कापूस विकला तर उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यामुळे कपाशीची विक्री केली जात नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

👉 शेतकऱ्यांना कापूस विक्री थांबवून फायदा होणार का? जाणून घ्या एका क्लिक वर 👈

सध्या कापसाचा हंगाम संपत आला आहे. मात्र, भाव वाढण्याचे संकेत सध्यातरी कमीच असल्याचे मानोरा शहरातील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत साइपले आहेत.

८,२०० रुपये मिळतो भाव

कापसाला गतवर्षीप्रमाणे यंदाही १२ ते १३ हजार रुपये प्रति क्विटल भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सद्यस्थितीत भाव अत्यंत कमी मिळत आहे. काही दिवसांपूर्वी साडेआठ हजार क्विटलचा भाव कपाशीला होता. आजमितीस मानोरा येथे कपाशीला ८,२०० ते ८.३०० रुपये प्रति क्विटल दर मिळत आहे. भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

👉 शेतकऱ्यांना कापूस विक्री थांबवून फायदा होणार का? जाणून घ्या एका क्लिक वर 👈