2 Bhk Flat In Navi Mumbai : सिडकोच्या रहिवासी प्रकल्पांमध्ये घरे (Flat In Navi Mumbai) मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दलालांचा सध्या पेवच फुटला आहे. विशेष म्हणजे हे लोक सिडकोच्या काही योजना जाहीर होण्यापूर्वीच घराचा नंबर लावून देता येतो, असा आव आणत आहेत. यासाठी एलआयजी आणि ईडब्ल्यूएसच्या आकारमानानुसार प्रति घर एक ते दोन लाख रुपये आकारले जात आहेत. यामागे सिडकोचे अधिकारी गुंतले असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
नवी मुंबईत एक लाख घरांच्या (Flat In Navi Mumbai) बांधकामासाठी सिडको सध्या युद्धपातळीवर काम करत आहे. बामणडोंगरी, तळोजा, खारघर येथे प्रामुख्याने घरे बांधली जात आहेत. यासोबतच खांदेश्वर, मानसरोवर, खारघर, जुईनगर या रेल्वे स्थानक परिसरातही घरे (Flat In Navi Mumbai) बांधली जात आहेत. या गृहनिर्माण प्रकल्पात वन बीएचके ते टू बीएचके आकारमानाच्या घरांचा समावेश आहे. ही सर्व घरे रेल्वे स्टेशनच्या शेजारी असल्याने मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या घरांना ग्राहकांकडून मोठी मागणी असणार आहे.
15 ऑगस्टला सिडकोची 8 हजार घरांची लॉटरी । इथे क्लीक करून करा रजिस्ट्रेशन
या घरांसाठी सिडको लॉटरी काढत आहे. 15 ऑगस्ट रोजी घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र सिडकोने अद्याप त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीसुद्धा अंदाज आणि विविध तर्क लढवून ही घरे विक्री केली जात असल्याचा दावा काही दलाल वर्गाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या घरांच्या किमती आपसात ठरवून नागरिकांना चुकीचे प्रोत्साहन दिले जात आहे. याबाबत सिडको अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार करण्याची विनंती केली आहे.
वाचा : मोठी बातमी : म्हाडा’ची घरं मालकी हक्काने न देण्याचा निर्णय
स्टॅम्प पेपरचा वापर
उलवे, सीबीडी-बेलापूर, नेरुळ, जुईनगर-सानपाडा, घणसोली या भागात दलालांकडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. स्टॅम्प पेपरवर लिहून नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन धूळफेक केली जात आहेत. अशा स्टॅम्प पेपरवर लिहिलेल्या कागदावर विश्वास ठेवून नागरिकही लाखोंची रोकड या दलालांच्या हातात टाकत आहेत.