‘या’ इमारतीत घरांची खरेदी करू नका..! नवी मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील विविध भागात बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू आहे. अशा ४३ बेकायदा बांधकामांची यादी महापालिकेने जाहीर केली असून, या इमारतीत घरे किंवा व्यावसायिक गाळे विकत घेऊ नका, असे आवाहन नागरिकांना केले आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने हीच यादी प्रसिद्ध केली होती. नवी मुंबई शहरात संबंधित विभागांच्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे भूमाफियांचे फावले आहे. … Read more