आशिया चषक सप्टेंबरमध्ये

cup

नवी दिल्ली : आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) गुरुवारी ५० षटकांच्या प्रारूपात खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकाचे आयोजन सप्टेंबरमध्ये केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. ही स्पर्धा कुठे खेळवली जाईल, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या पाकिस्तान अधिकृत यजमान आहे. मात्र, दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे तेथे खेळण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने आधीच दिले. पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमीज … Read more

ईशान किशनची ट्वेण्टी-20 क्रमवारीत मुसंडी

Ishan kisan

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीने (आयसीसी) गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ट्वेण्टी-२० फलंदाजांच्या सुधारित क्रमवारीत भारतीय खेळाडू चमकले आहे. यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनने १० पायऱ्यांची सुधारणा करत २३ वे स्थान गाठले. तर, अष्टपैलू दीपक हुडा पहिल्या शंभरमध्ये दाखल झाला आहे. श्रीलंकेविरोधातील ट्वेण्टी-२० मालिकेतील सलामीच्या लढतीतील कामगिरीमुळे दोघांच्या क्रमवारीतील स्थानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. वानखेडेवरील लढतीत हुडाने … Read more

‘सॉफ्ट सिग्नलपासून मुक्ती द्या’ स्टोक्स भडकला!

ben stoks

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनी मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मार्को पेन्सेनच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मानस लँबुशेन याचा झेल पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने पकडला. हा चेंडू जमिनीला लागून गेल्याचे रिप्लेत दिसत होते. मैदानी पंचाने मात्र लँबुशेनच्या निर्णयाबाबत तिसऱ्या पंचांचा आधार घेतला तिसऱ्या पंचांनी लॅबुशेनला नाबाद ठरविले. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनादेखील लॅबुशेन झेलबाद असल्याची खात्री … Read more

बीसीसीआयने महिला आयपीएल संघांच्या मालकीसाठी मागवल्या निविदा

WIPL

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मार्चमध्ये होणाऱ्या महिला इंडियन प्रीमियर लीग (डब्ल्यूआयपीएल) च्या पहिल्या हंगामासाठी संघांच्या मालकी आणि संचालनासाठी निविदा आमंत्रित केल्या आहेत. महिला आयपीएलचा पहिला हंगाम ३ ते २६ मार्चदरम्यान खेळवला जाण्याची शक्यता आहे. यानंतर पुरुषांच्या आयपीएलचे आयोजन केले जाईल. बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला इंडियन … Read more

ऋषभ पंतला मुंबईत केले एअरलिफ्ट

pant

नवी दिल्ली: स्टार यष्टिरक्षक – फलंदाज ऋषभ पंत अस्थिबंधनाच्या दुखापतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला डेहराडून येथील रुग्णालयातून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला नेण्यात आले आहे, जेथे त्याच्यावर गुडघा आणि घोट्याच्या अस्थिबंधनाच्या दुखापतींवर व्यापक उपचार केले जातील, असे भारतीय क्रिकेट ” नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले. या शस्त्रक्रियेमुळे त्याला अनिश्चित काळासाठी … Read more

बुमराहचे एकदिवसीय संघात पुनरागमन

bumrah bowling

मुंबई : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून (एनसीए) तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. निवड समितीने त्यानुसार श्रीलंकेविरोधात १० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात त्याला स्थान दिले आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ याअगोदरच जाहीर करण्यात आला होता. बुमराहच्या रूपात त्यामध्ये आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. राष्ट्रीय संघाकडून बुमराह … Read more

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंचा संघ खेळण्यास सज्ज

hardik pandya

मुंबई भारतीय ट्वेण्टी-२० संघ श्रीलंकेविरोधात मंगळवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतून २०२४ विश्वचषकाच्या मोहिमेला प्रारंभ करेल. रोहित शर्मा, विराट कोहली व लोकेश राहुल या अनुभवी त्रिकुटाविना खेळणाऱ्या संघात युवा चेहऱ्यांचा भरणा आहे. परिणामी, हार्दिकच्या नेतृत्वगुणांची परीक्षा या निमित्ताने पाहण्यास मिळेल. आशिया चषक विजेता श्रीलंकन संघ यजमान भारताला आव्हान देण्याच्या तयारीत असेल. ऑस्ट्रेलियातील ट्वेण्टी २० विश्वचषकातील … Read more

पंत आयसीयूमधून बाहेर

pant

नवी दिल्ली : रस्ते अपघातात गंभीररीत्या जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळेच अतिदक्षता विभागातून (आयसीयू) पंतला खासगी कक्षात हलवण्यात आले आहे. पंतची प्रकृती चांगली असून संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून खासगी कक्षात हलवण्यात आले असल्याचे दिल्ली जिल्हा आणि क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा यांनी सांगितले. अपघातानंतर पंतच्या चेहऱ्याला आणि … Read more

भारत-पाक कसोटी मेलबर्नमध्ये?

IND vs PAK

मेलबर्न: भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील कसोटी सामन्याच्या आयोजनाबाबतची शक्यता मेलबर्न क्रिकेट संघ पडताळून पाहत आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाचे (एमसीजी) मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उभय संघातील सामन्याच्या आयोजनाबाबत आयसीसीकडे पाठपुरावा करायला हवा, असे फॉक्स म्हणाले. कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती चिंताजनक असते आणि त्यामुळे स्टेडियम रिकामे दिसते. … Read more

धोनी कन्या झिवाला मेस्सीकडून जर्सीची भेट

Ziva

नवी दिल्ली: फिफाच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सचा पराभव करून तिसऱ्यांदा विश्वचषक पटकावला. यंदाच्या स्पर्धेत लियोनेल मेस्सीने आपला करिष्मा दाखवत आपण सातवेळा विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू का आहोत, हे दाखवून दिले. मेस्सी संघात असताना अर्जेंटिनाचे हे पहिलेच विजेतेपद असल्यामुळे क्रीडा जगतात लियोनेल मेस्सीचे नाव गाजले. विश्वचषक स्पर्धा आटोपून दहा दिवस उलटून … Read more