‘स्वराज्यरक्षक’ उपाधीवर अजित पवार ठाम

Ajit Pawar

मुंबई : महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांविरोधात भारतीय जनता पक्ष कधी कारवाई करणार? असा प्रश्न विचारून विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांबाबतच्या आपल्या वक्तव्याचे पुन्हा एकदा समर्थन केले. ‘स्वराज्यरक्षक’ ही अधिक व्यापक आणि मोठी उपाधी असल्याने तीच बरोबर आहे, असे ते म्हणाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी मी पाठपुरावा केला. … Read more

आता करता येणार ‘रिमोट’ मतदान; कुठूनही बजावता येणार हक्क

voting

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक नागरिकाचा लोकशाही (Democracy) प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) ‘रिमोट व्होटिंग मशीन'(Remote voting machine) (आरव्हीएम(RVM)) तयार केली आहे. देशाच्या विविध राज्यांत व शहरांतील मतदारांना ‘आरव्हीएम’द्वारे हक्क बजावता येणार आहे. या नव्या मशीनचा डेमो १६ जानेवारीला होणार आहे. त्याकरिता मान्यताप्राप्त ८ राष्ट्रीय पक्ष व ५७ प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना … Read more

संघर्षानंतर मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालये सील

sealed

मुंबई : मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावरून शिवसेनेच्या ठाकरे, शिंदे गटात झालेल्या संघर्षानंतर पालिकेतील सर्व पक्ष कार्यालये प्रशासनाने सील केली आहेत. पालिका आयुक्तांच्या या कारवाईनंतर याचे पडसाद उमटले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवकांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात धडक देत आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. यावेळी शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तब्बल अडीच तासांच्या आंदोलनानंतर खासदार … Read more

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर निर्णय घेण्याचे सहकारमंत्र्यांचे आश्वासन

Cooperation Minister Atul Save

नागपूर : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न आणि मागण्यांवर तत्काळ बैठक आयोजित करून योग्य ते निर्णय घेण्याचे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी विधानसभेत दिले.साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवणारे, ऊस वाहतूक करणारे कंत्राटदार-मुकादम साखर कारखान्यांकडून आगाऊ उचल घेऊनही काम पूर्ण करत नाहीत.ऊसतोडणीचे काम अर्धवट सोडून पळून जातात. ऊसतोड मजुरांचे, ट्रॅक्टर खरेदी करून ऊस वाहतूक व्यवसाय … Read more

आजी व आईसारखे गुण असणारी अर्धांगिनी मिळावी – राहुल गांधी

rahul gandhi

नवी दिल्ली : आपली दिवंगत आजी इंदिरा गांधी व आई सोनिया गांधी यांच्याशी जुळणारे गुण असणारी मुलगी अर्धागिनी म्हणून मिळावी, अशी इच्छा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी व्यक्त केली. मला शिव्या द्यायच्या असतील तर खुशाल द्या. अशा शिव्यांचे मी स्वागतच करतो, असे प्रत्युत्तर राहुल यांनी टीकाकारांना दिले. राहुल गांधी यांनी यू-ट्युब चॅनलला दिलेल्या … Read more

अनिल देशमुखांची अखेर कारागृहातून सुटका

Anil Deshmukh

मुंबई : १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचारामुळे गेल्या १३ महिन्यांपासून कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने अखेर मोठा दिलासा दिला. देशमुख यांना मंजूर केलेल्या जामिनाला यापूर्वी दिलेल्या स्थगितीला आणखी मुदतवाढ देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तब्बल १३ महिन्यांनी तसेच जामीन मिळूनही १७ दिवस कारागृहात … Read more

महसूलमंत्री विखे-पाटील यांचे आरोप खोटे व दिशाभूल करणारे

Vikhe-Patil

नागपूर : वाशिम गायरान जमीन वाटप हे तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात झाले, अशी खोटी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देऊन राज्यातील जनतेची दिशाभूल केली असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाने केली. आपले भ्रष्ट चेले अब्दुल सत्तार यांना वाचवण्यासाठी विखे-पाटील असत्य कथन करत असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर गायरान जमीन तत्कालीन महसूल … Read more

उपसरपंच पदाच्या निवडीसाठी इच्छुकांचे आतापासूनच लॉबिंग !

election

नाशिक : जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यात पार पडलेल्या १९६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत युवा वर्गाच्या हाती गावातील कारभाराच्या चाव्या सोपविल्या. आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या सर्व ग्रामपंचायतींची पहिली ग्रामसभा पार पडणार आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या सभांमध्येच उपसरपंचाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केले आहे. जिल्ह्यात १४ … Read more

कृषी मंत्रालयातून १५ कोटी वसुलीचे टार्गेट

ajit pawar

अजित पवारांचे विधानसभेत आरोप; उपमुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश ! नागपूर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होणाऱ्या महोत्सवासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना या महोत्सवासाठी १५ कोटी जमवण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. ही माहिती समोर आणतानाच पवार यांनी आक्रमक होत सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर तातडीने चौकशी करण्याची … Read more

रस्ते उभारणीतून होणार सामान्यांना फायदाच फायदा!

mahamarg

कल्याण: रस्ते विकासासाठी केवळ अर्थसंकल्पावर अवलंबून न राहता भांडवली बाजारातून पैसे उभे करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अशा प्रकल्पांसाठी अनेक संस्थाही अर्थसहाय्य करायला तयार आहेत. मात्र सामान्यांसाठीची रस्ते उभारणी सामान्यांनी उभारलेल्या निधीतूनच करण्याचे सूतोवाच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे एका कार्यक्रमादरम्यान केले. सामान्य नोकरदारांच्या पैशांतूनच द्रुतगती महामार्गाची उभारणी होईल, शिवाय त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर … Read more