‘सॅटेलाइट’च्या माध्यमातून मिळणार वीज पडण्याचा ‘अलर्ट’

Electricity

नागपूर : देशात पावसाळ्यात वीज पडून जीव जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानातून तीन ते सहा तास अगोदरपर्यंत वीज पडण्याचा इशारा देणे शक्य आहे. मात्र, लवकरच ‘सॅटेलाइट’च्या माध्यमातून संबंधित भूभागात १० मिनिटांअगोदर वीज पडण्याची नेमकी वेळ कळू शकणार आहे. यादृष्टीने ‘इस्त्रो’च्या वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातील वीज पडण्याच्या घटना लक्षात घेता ‘इस्त्रो’ व … Read more

भूखंड प्रकरणावरून गदारोळ, विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

nagpur

नागपूर : नागपूरमधील भूखंड वाटपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर न्याय प्रशासनातील कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पूर्ण निकाल येईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी लावून धरली. नागपूरमधील झोपडपट्टीधारकांच्या आवास योजनेसाठी भूखंड ताब्यात घेण्यात आले होते. याबाबत एका … Read more

‘समृद्धी’ वर टायर देऊ शकतात धोका?

'समृद्धी' वर टायर देऊ शकतात धोका

नागपूर : समृद्धी महामार्गाच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी १२०० वाहनांनी समृद्धीवरून शिर्डीला पोहोचण्याचा प्रयत्न केला. दररोज ही संख्या वाढतच आहे. या महामार्गावरील वाहनांच्या वेगावर सध्या तरी चेक नसल्याने वेगमर्यादा ओलांडली जात आहे; पण हा वेगवान प्रवास करताना वाहनांचे टायर कधीही धोका देऊ शकतात. त्यामुळे ऑटोमोबाइल तज्ज्ञांनी या प्रवासात टायरची काळजी घेण्याचा … Read more

बाजार समितीत आगीचे तांडव, कळमन्यात कोट्यवधींची मिरची खाक

nagapur

नागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची बाजारात मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत जवळपास दीड ते दोन हजार मिरचीचे पोती जळून खाक झाली. आगीत कोट्यवधींची नुकसान झाले आहे. आग मध्यरात्रीनंतर लागल्यामुळे प्राणहानी झाली नाही. काहींनी शॉर्टसर्किट आणि घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पण, आगीचे नेमके कारण पोलिस आणि समितीच्या तपासात निष्पन्न होणार आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार, मध्यरात्रीनंतर … Read more

शेतातून घरी परतणाऱ्या 2 शेतकऱ्यांवर पडली वीज, मृतदेहासह बैलगाडी पोहोचली घरी

nagapur

नागपूर : पावसाचा अंदाज आल्याने सालगड्यासह मजूर गावाकडे जात असताना वीज पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास मांगली (जगताप) परिसरात घडली.गुंडेराव भाऊराव गेडाम (५२) सालदार व ओमेश्वर प्रभूजी पोपटकर (४७) मजूर रा. मांगली (जगताप), अशी मृतकांची नावे आहे. शेतमालक प्रवीण जळीत यांच्याकडे गेडाम हे सालगडी होते. सालगड्यासह पोपटकर हे … Read more

नागपूरात कार आणि दुचाकीची भीषण टक्कर, 4 बाईकस्वार उड्डाण पुलावरून खाली पडले, सर्वांचा मृत्यू

Nagpur car bike accident

नागपूर : महाराष्ट्रातील नागपुरात आज सकाळी एक अत्यंत वेदनादायक दुर्घटना घडली. नागपूरच्या साखरदरा पुलावर कार आणि दुचाकींची समोरासमोर धडक झाली, त्यात चार जणांचा मृत्यू झाला. असे सांगण्यात येत आहे की कारने एकाच वेळी अनेक बाइक्सला धडक दिली, ज्यामध्ये वेगवेगळ्या बाईकवर स्वार असलेल्या या चौघांनी पुलावरून खाली उडी मारली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलीस … Read more

नागपूरात कारने दुचाकींना उडवले, कारच्या धडकेत उड्डाणपुलावरुन 80 फूट खाली कोसळले, चौघांचा मृत्यू

nagapur

नागपूर : दिवसेंदिवस राज्यात अपघातांची संख्या वाढत आहे. आता आणखी एका भीषण अपघाताची बातमी नागपुरातून समोर आली आहे. कार आणि दुचाकीच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला. नागपुरातील सक्करदरा उड्डाणपुलावर कार आणि दुचाकीची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील प्रवासी कारला धडकल्यानंतर थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळले. या भीषण अपघातात चौघांचा जागीच … Read more

मैत्रिणीनेच तिला राजस्थानात विकायला नेले! दोन लाखांत गरीब घरातील सुशिक्षित मुलीचे लग्न लावून देण्यासाठी केला सौदा

crime rape

नागपूर : गरीब घरातील एका सुशिक्षित मुलीला राजस्थानमध्ये नेऊन तेथे विकण्याचा प्रयत्न झाला. तिच्या महाविद्यालयीन जीवनातील मैत्रिणीनेच तिचा विश्वासघात केला व दोन लाख रुपयांत लग्न लावून देण्याचा सौदा केला होता. मुलीला योग्यवेळी नेमकी बाब कळल्याने समयसूचकता दाखवत ती तेथून निसटली. परंतु, या प्रकारामुळे तिला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

आश्चर्यच! एक गाव… तीन ग्रामपंचायती; दस्तावेजासाठी नागरिकांची भटकंती

village

नागभीड (चंद्रपूर) : कुनघाडा चक हे असे एक गाव आहे की या गावाची तीन ग्रामपंचायतींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे दस्ताऐवजासाठी तीन ग्रामपंचायतींमध्ये चकरा माराव्या लागत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. कुनघाडा चक हे गाव काही रिठांमध्ये विभागल्या गेले असले तरी लौकिक अर्थाने एकच गाव आहे. हे गाव नागभीड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे. मोहाळी या गावाला हे … Read more

‘काफिर अब तेरी गर्दन उतारी जाहीर’- नूपुर शर्माचे समर्थन करणाऱ्या शिवसेना नेत्याला धमकी

Lawrence Gregory shivsena

नागपूर: नागपुरातील मोहन नगर येथील रहिवासी असलेल्या शिवसेना कार्यकर्ता लॉरेन्स ग्रेगरी (Lawrence Gregory) यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांना तिच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियावर पाठिंबा दिल्याबद्दल धमकीचे संदेश मिळाल्याचा दावा केला आहे. लॉरेन्स ग्रेगरीने आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केल्यानंतर नागपूर पोलीस त्यांना सुरक्षा पुरवू शकतात. ग्रेगरी यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी धमकीचे … Read more