Mumbai Mhada Lottery: म्हाडा मुंबई मंडळाच्या विजेत्यांना 45 दिवसात हे काम करावेच लागणार

Mumbai Mhada Lottery : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4,082 घरांच्या सोडतीतील 3,515 पात्र विजेत्यांना सोमवारी तात्पुरती देकार पत्रे ऑनलाइन देण्यात आली. या पत्रानुसार, विजेत्यांनी फ्लॅटच्या एकूण किमतीच्या 25 टक्के रक्कम 45 दिवसांच्या आत (19 ऑक्टोबरपर्यंत) भरणे बंधनकारक आहे. परंतु म्हाडाने 45 दिवसांत 10 टक्के रक्कम भरण्यास परवानगी दिल्याचा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. ही माहिती चुकीची आहे आणि विजेत्यांना गृहकर्जासाठी फक्त 10% रक्कम भरून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळवण्याची मुभा देण्यात आली आहे. उर्वरित 15 टक्के रक्कम निर्धारित कालावधीत (45 दिवस) भरावी लागेल. अन्यथा घर रद्द होण्याची शक्यता आहे.

सोडतीनंतर, पात्र विजेत्यांना तात्पुरती देकार पत्र पाठवल्यानंतर घराच्या किमतीच्या 25 टक्के रक्कम 45 दिवसांच्या आत आणि 75 टक्के रक्कम 60 दिवसांच्या आत भरून घेण्यात येते. विशेष म्हणजे 45 दिवस आणि पुढील 15 दिवसांच्या मुदतवाढ मिळाल्यानंतर 25 टक्के रक्कम न भरल्यास घर रद्द करण्यात येते. उर्वरित 75 टक्के रक्कम पुढील 60 दिवसांत किंवा 90 दिवसांच्या मुदतीत न भरल्यास घर रद्द करण्यात येते दरम्यान, म्हाडाने दहा टक्के रक्कम भरण्यास परवानगी दिल्याचा संदेश सोशल मीडियात फिरत असल्याचे वृत्त आहे.

म्हाडाच्या इतिहासात पाहिल्यांदाच सोडत काढल्यानंतर 20 दिवसांत रक्कम भरून घेऊन घरांचा ताबा दिला जात आहे. विजेत्यांना इतक्या कमी कालावधीत 25% रक्कम जमा करणे किंवा गृहकर्ज घेणे शक्य नाही. म्हणून, अनेक विजेत्यांनी 45 दिवसांत 10 टक्के आणि उर्वरित 90 टक्के रक्कम 60 दिवसांत भरण्याची परवानगी मागितली. म्हाडाने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता 45 दिवस आणि अतिरिक्त 15 दिवसांची मुदतवाढ मिळाल्यास 25 टक्के रक्कम या कालावधीत भरणे आवश्यक आहे. अन्यथा, घर रद्द केले जाईल, असे मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

महत्त्वाचे म्हणजे 90 टक्के गृहकर्ज मिळण्याची हमी देणारे बँकेचे पूर्वपरवानगी पत्र देणाऱ्या विजेत्यांना सुरुवातीला 10 टक्के रक्कम भरून गृहकर्जासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याची मुभा आधीपासूनच सोडत प्रक्रियेत समाविष्ट आहे. दरम्यान, या तरतुदीचा फायदा घेत म्हाडाने 45 दिवसांत 10 टक्के रक्कम भरण्यास परवानगी दिली असून, मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती समाजात माध्यमातून पसरत आहे. दरम्यान, म्हाडाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. सोशल मीडियावरील हा संदेश चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. या मेसेजला बळी न पडता विहित मुदतीत घराची रक्कम भरा, असे आवाहन म्हाडाने केले आहे.

वाचा : MHADA Lottery Nagpur: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, नागपूरमधील घरांसाठी दिवाळीत सोडत

Leave a Comment