नाशिक : यंदा रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे उत्तर महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खतांची मागणीही वाढली आहे. मात्र, अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. रासायनिक खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवड सध्या जोरात चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने रब्बीच्या पिकांना फायदा मिळणार आहे. अनुकूल हवामानामुळे उत्तर महाराष्ट्रात लागवडयोग्य क्षेत्र वाढले असल्याने रासायनिक खतांची मागणी जास्त आहे. अलीकडे अनुदानित खत पुरवठादारांनी अचानक खतांच्या किमती वाढवल्याने एवढी महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. राज्यात अधिक प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
त्यामुळे वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अभिमन पगार यांनी निवेदनाद्वारे कृषिमंत्र्यांकडे केली आहे. केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा आढावा घेवून दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
खतांच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या; ऐन हंगामात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट