मिळेल त्या दरासाठी लाखो क्विंटल कांदा बाजार समितीत दाखल..!

onion news nashik district

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपूर्वी चाळीत साठवणूक केलेला उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात खराब होऊ लागला आहे. त्यामुळे मिळेल तो बाजारभाव पदरात पाडण्यासाठी बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस काढल्याने नाशिक जिल्ह्यातील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत उमराणे येथे कांद्यांची प्रचंड आवक झाली. सप्ताहातील अवघ्या चार दिवसात सुमारे १ लाख क्विंटल आवक झाली … Read more

हवामान अंदाज : पुढील 5 दिवस या भागात मुसळधार पाऊस, शेतकर्‍यांसाठी अंदाज महत्वाचा..!

Havaman Andaj

Havaman Andaj : सध्या राज्यभरात सगळीकडेच पाऊसच पाऊस होत आहे. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात शेतकर्‍यांना चिंता सतावत असली तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडणार. तसेच सर्व धरणे आणि तळे हे कमी वेळातच भरतील, असा महत्वाचा अंदाज … Read more

‘म्हाडा’ सोडतीतील अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या (mhada lottery 2023) कोकण मंडळाच्या मेमधील ४ हजार ६५४ घरांच्या सोडतीतील २७२ विजेत्यांनी अद्याप आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. या विजेत्यांना आणखी एक संधी म्हणून मंडळाने कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता या विजेत्यांना ५ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार आहेत. म्हाडाच्या नव्या संगणकीय प्रणालीनुसार, नव्या बदलानुसार अर्ज … Read more

पावसाने भरवली धडकी; मुंबईकरांच्या नाकीनऊ

मुंबई : वेगाने वाहणारे जोरदार वारे, कोसळणारे टपोरे थेंब, रस्तोरस्ती वाहणारे पाण्याचे लोंढे अशा काहीशा जलमय झालेल्या मुंबईतून मुंबईकरांनी वाट काढत ऑफिस आणि घर गाठल्याचे चित्र होते. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी रात्रीपर्यंत अक्षरश: धो धो कोसळत होता. हा पाऊस मुंबईकरांना धडकी भरवत होता. दिवसभर असाच सुरू असलेल्या पावसाच्या खोळंब्यामुळे मुंबईकरांच्या नाकीनऊ आले होते. … Read more

कापसावर मर, लाल्याचा प्रादुर्भाव वाढला!

जळगाव : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला आहे. तरीदेखील मन्याड आणि गिरणा धरणातील पाणीसाठा पुरेसा वाढलेला नाही. गावागावांतील विहिरी कोरड्या आहेत. त्यातच कापसावर लाल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे घरात जपून ठेवलेला मागील वर्षाचा कापूस कमी आणि मिळेल त्या भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, तर अनेक शेतकऱ्यांना शेतातील कपाशीची रोपेच … Read more

आवक नसल्याने तूर डाळीचे भाव गगनाला भिडलेलेच…

जळगाव : तुरीची आवक यंदा घटल्याने तूर डाळीचे दर वाढतच जात आहे. गेल्या १५ दिवसांपासून बाजारात १३८ ते १४५ रुपये किलो दरावर तूर डाळीचे दर स्थिर आहेत. त्यातच आता बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक पूर्णपणे बंद झाल्यामुळे आगामी काही महिने तरी तूर डाळीचे भाव कमी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भातावरचे वरण सर्वसामान्यांना जरा महागच पडणार … Read more

अडते अन खरेदीदारांच्या वादात शेतकऱ्यांचे सव्वाशे कोटी थकले

नांदेड : कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असते. परंतु, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती आडते अन् खरेदीदारांच्या भांडणात बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकरी अडचणीत सापडत आहे. मागील दोन महिन्यांपासून खरेदीदारांनी पेमेंट न केल्याने आडत्यांकडे जवळपास सव्वाशे कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकले आहेत. वारंवार मागणी करूनही पेमेंट होत नसल्याने गुरुवारी शेतकरी, आडत्यांनी बीट बंद पाडले … Read more

कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करा, ३ कोटी अनुदान घ्या

Agriculture-business

छत्रपती संभाजीनगर : स्टेट ऑफ महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट योजनेंतर्गत औरंगाबाद, बीड आणि जालना या तीन जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी आणि गटांच्या ५४ प्रकल्पांना शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या कृषी माल प्रक्रिया उद्योग सुरू करणे, गोदाम बांधणे यासाठी या कंपन्यांना तीन कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळेल, … Read more

‘या’ इमारतीत घरांची खरेदी करू नका..! नवी मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन

मुंबई

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील विविध भागात बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू आहे. अशा ४३ बेकायदा बांधकामांची यादी महापालिकेने जाहीर केली असून, या इमारतीत घरे किंवा व्यावसायिक गाळे विकत घेऊ नका, असे आवाहन नागरिकांना केले आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने हीच यादी प्रसिद्ध केली होती. नवी मुंबई शहरात संबंधित विभागांच्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे भूमाफियांचे फावले आहे. … Read more