औरंगाबाद : देशाबाहेर निर्यात करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये उद्योगनगरी औरंगाबादचे योगदान मोठे आहे. कोरोनाच्या संकटातदेखील उद्योगनगरी औरंगाबादने या क्षेत्रात आपला दबदबा दाखवून दिला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, निर्यातीच्या बाबतीत औरंगाबाद जिल्ह्याने देशात २७ वे स्थान पटकावले आहे.
देशातील ज्या जिल्ह्यांमधून औद्योगिक निर्यात केली जाते, त्यांची टॉप ३० यादी आकडेवारीसह या मंत्रालयाकडून दरवर्षी जाहीर केली जाते. यंदा एप्रिल २०२१ पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्याच सर्वेक्षणात महाराष्ट्राने बाजी मारली आहे.
निर्यात करणाऱ्या टॉप ३० जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद २७ व्या स्थानी आहे. गुजरातमधील जामनगर आणि सूरत या दोन जिल्ह्यांनी अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक लावला आहे. मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. पुणे पाचव्या, तर ठाणे १३ स्थानी आहे. रायगड १५, तर पालघर २८ व्या स्थानी आहे. औरंगाबादमधून मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंगसाठी लागणारी उत्पादने निर्यात होतात, तसेच पैठणी साडी, कापड, मराठवाडा केसर, बीडचे सीताफळ आदींची निर्यात होते.
प्लास्टिक व लिनोलिअम, मांस, दूध, कुक्कुट उत्पादने आदींची निर्यात औरंगाबादेतून होते. जिल्ह्यातून एकूण निर्यात १७३४.२२ कोटींची होते. औरंगाबादमधील उद्योगांना निर्यातीसाठी मोठा वाव आहे. येथील स्टील, ऑटोमोबाइल, फार्मसी उद्योगांकडून मोठी आयात-निर्यात केली जाते. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांनाही निर्यातीसाठी चांगली संधी आहे.
येथील विविध उद्योगांनी आपले मार्केटिंग करण्यासाठी विदेशातील प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. यासाठी सीएमआयएने पुढाकार घेतला आहे. वाणिज्य मंत्रालयदेखील यादीतील प्रत्येक जिल्ह्याची निर्यात आणखी वाढवण्यासाठी तसेच परदेशातील खरेदीदार वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी उत्पादने आणि सध्याच्या निर्यातीच्या आकड्यांचे संकलन करण्यात आले आहे.
कबीरजीत सिंग यांच्या स्वदेशी फूड स्टार्टअप ‘बर्गर सिंग’ने आज लंडन…