व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करताच अकोटात कापसाला 9 हजारांचा भाव


Last Updated on December 16, 2022 by Piyush

अकोट : अकोट बाजार समितीने कापूस खरेदी प्रकरणात २० व्यापाऱ्यांचे परवाने निलंबन आदेश रद्द केला. अकोट जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने कोणत्याही अटी- शर्तीविना हे निलंबन रद्द केल्याचा दावा केला. तसेच बाजार समितीने व्यापाऱ्यांना अटी-शर्तीचे नोंद नसल्याचा आदेश प्राप्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे. दरम्यान, १५ डिसेंबर रोजी ५५० क्विंटल कापसाची हर्रासी झाली असून, ८ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

सौदापट्टी वर हलका माल वापस, अशी नोंद करण्यास बाजार नकार दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली होती. त्यामुळे बाजार समितीने ८ डिसेंबर रोजी २० व्यापाऱ्यांचे परवाने पंधरा दिवसांसाठी निलंबित केले होते. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी जिल्हा निबंधक यांनी घेतलेल्या संयुक्तिक सभेत कापूस खरेदी सुरू व निलंबन रद्द करण्यात आले. त्यामुळे आज बाजारात कापूस खरेदीला वेग आला. बाजारात ८ हजार ३०० ते ८ हजार ८०० रुपये हर्रासीत भाव देण्यात आला.

कापूस बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/12/2022
भोकरक्विंटल28843584858460
सावनेरक्विंटल1500840084508450
सेलुक्विंटल538865087958795
किनवटक्विंटल114810084008300
राळेगावक्विंटल1700830085408500
भद्रावतीक्विंटल17845084508450
समुद्रपूरक्विंटल300840086258500
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल179820086008400
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल224840084508425
घाटंजीएल. आर.ए – मध्यम स्टेपलक्विंटल395810083708250
उमरेडलोकलक्विंटल32841084208415
देउळगाव राजालोकलक्विंटल200845085308465
काटोललोकलक्विंटल170800085008300
कोर्पनालोकलक्विंटल914780083508100
सिंदीलांब स्टेपलक्विंटल21830085008400
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल235850086808600
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल20870087908775
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1320830086808470
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल475852586258600
यावलमध्यम स्टेपलक्विंटल5764085508230
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल345850085258511
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल382830087158575
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल201820085808390

वाचा : आंतरपिकातून कमावले १५ लाख, शहा यांच्या दीड एकरात बहरली केळी व झेंडू