अर्ज करा अन् मल्चिंग पेपर साठी अडीच लाख मिळवा! सरकारची नवीन योजना

पुणे : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत सगळ्याच पिकासाठी प्लास्टिक कव्हर योजना राबविण्यात येणार असून, राज्यातील ८ जिल्ह्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे अडीच लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.

द्राक्ष, डाळिंब व इतर कृषी उत्पादने हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारे पीक आहे. नैसर्गिक आपत्तींपासून शेतीचे संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर घटकांचा शासकीय योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. राज्यातील ८ प्रमुख जिल्ह्यांमध्ये १०० हेक्टरवर ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवणार आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ६ कोटी १४ लाख ४ हजार रुपयांच्या रकमेच्या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के अर्थात २ लाख ४० हजार रुपये प्रति एकर देण्यात येणार आहे.

अडीच लाख मिळ्वण्यासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

योजनेचा उद्देश

गारपीट व अवकाळी पाऊस यापासून द्राक्ष बांगाचे संरक्षण करणे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व प्रतीच्या निर्यातक्षम द्राक्ष उत्पाद- नासाठी आर्थिक सहाय्य करणे.
फळबागांकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे. ग्रामीण भागातील युवकांना स्वयं- रोजगार उपलब्ध करून देणे.

अनुदान घेण्यासाठी येथे क्लीक करा

योजनेची व्याप्ती :

नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, नगर व सातारा
क्षेत्र मर्यादा २० गुंठे ते १ एकरदरम्यान प्रति लाभार्थी लाभ देय राहील.
खर्चाची मर्यादा : ४,८१,३४४ रुपये प्रति एकर
अनुदान मर्यादा : २,४०,६७२ रुपये प्रतिएकर (५० टक्के)

वाचा : कांदा अनुदानासाठी निधी मंजूर…! शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार रक्कम ? वाचा…

Leave a Comment