Last Updated on December 30, 2022 by Vaibhav
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने प्लास्टिकविरोधी कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईत पुणे शहरात नऊ खटले दाखल करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अविघटनशील कचऱ्यामुळे एकूणच नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असल्याने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे ( उत्पादन, वापर विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक व तद्नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना, २०१८ संपूर्ण राज्यासाठी लागू केली आहे.
त्याविषयी सुधारित अधिसूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पुणे शहरात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महानगरपालिका कार्यरत असून महानगरपालिकेकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे.
फूल मार्केट, मार्केट यार्ड या भागात दंडात्मक कारवाई करून एकूण ४०० ते ४५० किलो प्लास्टिक जप्त केले व एकूण पाच केसेस २५ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. वाघोली परिसरात एकूण चार केसेस, ३० हजार रुपये दंड व एकूण ५५० ते ६०० किलो प्लास्टिक जप्त करून प्रभावी दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण ९ केसेस, ५५ हजार रुपये दंड व ९०० ते १५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
ही कारवाई घनकचरा उपआयुक्त आशा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईच्या वेळी कें द्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील शशिकांत लोखंडे, महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील इमामुद्दीन इनामदार, आरोग्य निरीक्षक राजेश रासकर, उमेश देवकर इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणावर गोळीबार