अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त


Last Updated on December 14, 2022 by Vaibhav

नाशिक : शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मंगळवारी (दि. १३ ) रात्री ९ वाजता हे आदेश जारी करण्यात आले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी पुण्याचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची पाटील यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.

नाईकनवरे यांच्या आधी पोलीस आयुक्त असलेले दीपक पाण्डेय यांचा कार्यकाळ त्यांच्या विविध आदेशांमुळे चांगलाच गाजला.दि. २० एप्रिल २०२२ रोजी त्यांची बदली मुंबईत करण्यात आली आणि त्यांच्या जागी नाईकनवरे यांनी दि. २१ एप्रिल रोजी नाशिकच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, जेमतेम आठ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच नाईकनवरे यांची गृह विभागाने बदली केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: नाशिक: रेशन दुकानदारांचे आंदोलन