Cotton Market: पांढऱ्या सोन्याची झळाळी कमी! कापसासह सरकीचे भावही गडगडले


Last Updated on December 6, 2022 by Piyush

जळगाव : गत वर्षी कापसाला (cotton rate) मिळालेला बारा हजारांचा भाव यंदा शेतकऱ्यांच्या (farmer) आशेवर अद्याप तरी पाणी फिरवत आहे. कापसाच्या भावाने खान्देशात कापसाचा पेरा वाढवला; परंतु भाव काही यंदा वाढले नाही. दहा हजारांच्या अपेक्षेचा कापूस ८ हजारी ते ८.५ हजारीच्या मध्यात येऊन बसला आहे. त्यामुळे भाववाढीच्या आशेवर नैराश्याचे सावट आहे.

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ७ हजार ८००चा भाव असलेला कापूस ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांना भाववाढीचे आमिष देऊन गेला.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ९ हजार ४००पर्यंत गेलाही; परंतु त्यानंतर कापूस गडगडला आणि थेट ८ हजार ८०० वर येऊन गेला. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कापसाने गिरकी घेत कापूस दररोज दोनशेने खाली येत आहे. ८ हजार ते ८ हजार ४०० असा सध्याचा दर झाला आहे.

गेल्यावर्षी कापसाला भाव चांगले होते. त्यामुळे यंदाही अनेकांनी कापूस पेरणीवर भर वाढला होता. आता मागणी घटल्याने पुन्हा दर कमी झाले आहेत.

भाव आणखी घसरण्याची शक्यता

दुसरीकडे जर कापसाची आवक जिनिंगमध्ये वाढली, तर मागणी घटल्याने दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. यंदा कापसाला किमान १० हजार भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस ठेवला आहे. परंतु, भाववाढीची स्थिती सध्या तरी दिसत नाही.

जागतिक बाजारपेठेत कापसाला मागणी नसल्याने कापसाचे दर दररोज घटत आहे. सरकी तेलही दीडशेवरून ११० झाले आहे. या सर्वांचा परिणाम कापसावर होत आहे. एकीकडे मजुरी, दुसरीकडे भाववाढीवर परिणाम या दोन्हीमुळे पांढया सोन्याची झळाळी कमी होत आहे.

गाठींचे भावही पडले

रुईच्या खंडीचे भावही पडत असून ६८ हजार असलेल्या रुईच्या खंडीचे दर २ हजारने तर ४ हजार असलेली सरकी थेट ६००ने तुटली असून ३ हजार ४०० झाली आहे.

सध्यातरी कापूस ८ हजारी ते ८.५ हजारी यातच दर राहील. कॉटन सिड ते कॉटन तेलचे पडत असलेले दर यामुळे असा परिणाम असून रुईचे दरही दोन हजारने पडले आहेत. – अरविंद बरडीया, संचालक, खान्देश जिनिंग.

मागणी कमी व सरकीचे दर तब्बल सहाशेने तुटल्याने कापसाच्या भाववाढीवर परिणाम होत आहे. – परेश जैन, जिनिंग उद्योजक.

सुरुवातीला शुभारंभाच्या फसवेगिरीने मजूरवर्गाने कापसाचा वेचणी खर्च दहा ते बारा रुपये किलोने घेतला. आम्हीही भाववाढीच्या आशेने हा दर दिला तर यात आज दोन्हीकडून शेतकऱ्यांची मरगट्टी झाली आहे. – राजेंद्र चौधरी, शेतकरी.

आजचे कापूस बाजभव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/12/2022
सावनेरक्विंटल2000820083008250
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल4820086008300
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल191820085008400
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल380850086508600
देउळगाव राजालोकलक्विंटल100865086908690
काटोललोकलक्विंटल100820085008400
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल135860088008700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1100840086808510
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल225875088708800
05/12/2022
सावनेरक्विंटल1750820083008250
भद्रावतीक्विंटल14850086008550
वडवणीक्विंटल7830085008500
मौदाक्विंटल185840085508475
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल587800086008500
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल543860087008650
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल202860087008650
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल50825083608321
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1350800088008400
उमरेडलोकलक्विंटल438837085258400
देउळगाव राजालोकलक्विंटल300860087808780
वरोरालोकलक्विंटल328850086808650
किल्ले धारुरलोकलक्विंटल7117865087128675
काटोललोकलक्विंटल165830086508500
कोर्पनालोकलक्विंटल545830085008400
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल7850085008500
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल124875088508770
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1468840088008605
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल210850087008600
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल239860086508625
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल790862589658750
नरखेडनं. १क्विंटल9800085008300

वाचा : कापूस खरेदी-विक्रीत आली कमालीची घट