Last Updated on December 21, 2022 by Vaibhav
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत चुकीचे व खळबळजनक दावे करणाऱ्या आणि फेक न्यूज पसरवणाऱ्या तीन यूट्यूब वाहिन्यांवर कारवाई करण्यात आल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी सांगितले. ‘न्यूज हेडलाईन्स’, ‘सरकारी अपडेट’ आणि ‘ आज तक लाईव्ह’ अशी कारवाई झालेल्या यूट्यूब चॅनलची नावे आहेत. प्रस्थापित वृत्तवाहिन्यांशी साधर्म्य असलेले नाव व लोगो वापरून लोकांची दिशाभूल करण्याचे काम या यूट्यूब वाहिन्यांकडून सुरू होते. बनावट बातम्या पसरवत या चॅनलकडून जाहिरातीच्या माध्यमातून कमाई केली जात होती, असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सांगितले.
पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन युनिट अर्थात एफसीयूने या तीन यूट्यूब चॅनलचा भंडाफोड केला. आहे. ३३ लाख सब्सक्राईबर असलेल्या या यूट्यूब चॅनलवरील व्हिडीओ जवळपास ३० कोटींहून अधिक वेळा पाहण्यात आले होते… सत्यशोधन प्रक्रियेत या यूट्यूब चॅनल्सवरील जवळपास सर्वच व्हिडीओ व मजकूर तथ्यहीन व अपप्रचार करणारे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने ही कारवाई केली आहे. न्यायालये, सरकारी योजना, ईव्हीएम, कृषी कर्जमाफीसंदर्भातील खोटी माहिती सनसनाटी पद्धतीने पसरवण्याच्या उद्देशाने ही चॅनल्स काम करत होती.
हेही वाचा: मटणाचा रस्सा वाढण्यावरून वाद, पोलिसाला मारहाण