पानमळ्यांना येणार अच्छे दिन


Last Updated on December 2, 2022 by Vaibhav

विळ : उमरखेड तालुक्यातील विडूळ आणि परिसर नागवेली अर्थातच विड्यांच्या पानांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, कही वर्षांपासून पानमळ्यांना उतरती कळा लागली होती. आता अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाने ‘नागवेली’ पिकाला मसाले महामंडळामध्ये नोंदणीकृत करण्याची भूमिका घेतल्यामुळे पानमळ्यांना अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. विडूळ परिसरात पूर्वी अनेक पानमळे होते. अनेक शेतकरी विड्याच्या पानांचे पीक घेत होते. मात्र, कालांतराने पानमळ्यांना उतरती कळा लागली. हे पीक घेणे जोखमीचे आणि खर्चिक ठरू लागले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पानमळ्यांकडे पाठ फिरविली. उल्लेखनीय म्हणजे विड्याचे पान हे महत्त्वाचे मानले जाते.

मुखशुद्धीसोबतच आयुर्वेदामध्ये अनेक रोगांवर रामबाण औषधी म्हणून त्याचा वापर केला जातो. येथील फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे रामेश्वर बिचेवार आणि चमूने नागवेलीवर नुकताच शोध निबंध कृषी विद्यापीठाला सादर केला, त्यात त्यांनी नागवेली कॅन्सरसाठी औषध म्हणून कशी उपयुक्त आहे, हे दाखवून दिले. नंतर अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांची भेट घेतली. यावेळी प्रा.डॉ. उंदीरवाडे, हरदास बनसोड, रामेश्वर बिचेवार, शिवानंद गांजरे आदींनी कुलगुरूंच्या दालनात साधक- बाधक चर्चा केली.

प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश

कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत नागवेली पिकाला मसाले महामंड- ळामध्ये नोंदणीकृत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीत नागवेली पिकाची इत्यंभूत माहिती रामेश्वर बिचेवार यांनी सादर केली. ही माहिती आणि पुराव्याच्या आधारावर कुलगुरू डॉ. शरद गडाख, प्रा. डॉ. उंदीरवाडे यांनी तत्काळ संबंधित विभागाला आदेश देऊन हा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले.हेही वाचा: शेतकऱ्याचा नाद खुळा..! जिरेनियम शेतीतून मिळविले लाखो रुपयांचे उत्पन्न