बोललेले शब्द ओळखणारे यंत्र


Last Updated on November 21, 2022 by Vaibhav

संगणकाचा वापर जसा सुरू झाला, तसं त्याचे कोणकोणते उपयोग करू शकतो याची चाचपणी सुरू झाली. संगणक माणसाचा आवाज ओळखू शकेल का यासाठी प्रयत्न सुरू झाले. यात अमेरिकेतील बेल लॅबोरेटरी अग्रक्रमांकावर होती. हे काम प्रचंड कठीण होतं. याच कारण अनेकदा लक्षावधी माणसांच्या आवाजात लक्षावधी प्रकारे फरक आढळतो. हे आपला चेहरा ओळखण्याइतकंच कठीण होतं. मात्र, बेल लॅबोरेटरीतल्या वैज्ञानिकांनी चिकाटीने काम चालू ठेवलं आणि ऑडिओ रेकग्नेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ऑड्रे या टोपणनावाचं तंत्रज्ञान विकसीत केलं. ऑटोमॅटिक डिजिटल रेकग्नेशन असं याच पूर्ण नाव. ऑड्रेला सुरुवातीला शब्द ओळखणे कठीण जात होते. त्यामुळे त्याच्याकडे केवळ आकडे ओळखण्याचं काम देण्यात आलं

यात हे यंत्र बऱ्यापैकी यशस्वी ठरले. शब्द ओळखण्याचे तंत्रज्ञान शोधणं आवश्यक होतं. ते जर झालं असतं तर माणूस बोललेलं कागदावर लिहू शकला असता. आज गूगल वॉइस ॲप वापरणारे आपण अनेक जण बोलून टेक्स्ट करतो. पण, ही यंत्रणा बेलच्या वैज्ञानिकांनी १९५२ मध्ये आणली. अनेक ट्रायल्स आणि एरर्स पार करत ही यंत्रणा यशस्वी झाली. संगणक युगाच्या जन्मात आणखी एक शोधाची भर पडली. बेल लॅबोरेटरीचा एकूणच डिजिटल जगात खूप मोलाचा वाटा आहे. ऑड्रे हे शब्द ओळखणारे यंत्र हा त्यांचा खूप मोठा शोध आहे. हेही वाचा: Microscope: मायक्रोस्कोपचा शोध कोणत्या पितापुत्रांनी लावला?