शंभर वर्षांचे आजोबा रोज करतात तीन तास व्यायाम


Last Updated on December 23, 2022 by Vaibhav

वॉशिंग्टन : वयाची साठी, सत्तरी पार केल्यानंतर माणसाच्या शरीरातील बरेचसे अवयव काम करेनासे होतात. सत्तर वर्षे किंवा त्यापुढील वयाची बहुतांश माणसे अंथरूणाला खिळलेली असतात. त्यांना साधे चालणे-फिरणेही कठीण झालेले असते. मात्र, याला अमेरिकेतील एक आजोबा अपवाद ठरले आहेत. या आजोबांनी वयाची शंभरी गाठली आहे. तरीही ते एखाद्या तरुण मुलासारखे रोज व्यायामशाळेत जाऊन तब्बल तीन तास व्यायाम करतात लेस सव्हिनो असे या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव आहे.

लेस सव्हिनो यांनी यावर्षी ऑगस्ट महिन्यात वयाची शंबरी पूर्ण केली आहे. एवढे दीर्घायुष्य लाभलेल्या लेस यांनी मागील सुमारे चाळीस वर्षांपासून नियमित व्यायाम करण्याचा शिरस्ता जारी ठेवला आहे. ते आपल्या तंदुरुस्तीचे श्रेय नियमित व्यायाम करण्यालाच देतात. ते सकाळी साडेसात ते साडेदहा असे तीन तास व्यायामशाळेत कसून व्यायाम करतात. सन १९८३ पासून त्यांना हा शिरस्ता सुरू ठेवला आहे.

■ लेस आपल्या खाण्या-पिण्याबाबतही जागरूक आहेत. त्यांचे डाएट अगदी आदर्श म्हणावे असे आहे. खाण्यामध्ये ते भरपूर साऱ्या हिरव्या पालेभाज्या आणि सी फूड पसंत करतात. त्यांच्या जेवणामध्ये तळलेले किंवा मसालेदार पदार्थ कधीच नसतात.

■ लेस सोमवार ते शुक्रवार असे आठवड्यातील पाच दिवस व्यायामशाळेत जातात. त्यांना फक्त हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे. त्यासाठी त्यांना नियमित गोळ्या घ्याव्या लागतात.

हेही वाचा: इलॉन मस्क द्विटरचे सीईओपद सोडणार, मूर्ख माणूस मिळाल्यावर देणार पदाचा राजीनामा