मुंबई : तारदेव परिसरातील एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत मृत आणि जखमींना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाने अपघातानंतर काही तासांतच मृत आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली. त्यानुसार अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
तारदेव परिसरातील भाटिया हॉस्पिटलला लागून असलेल्या इमारतीला भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 20 मजली इमारतीच्या 18व्या मजल्यावर आग लागली. या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ही आग आज सकाळी 7.30 च्या सुमारास लागली. दरम्यान, अग्निशमन विभागाने रात्री आठच्या सुमारास आगीची पातळी 3 असल्याचे जाहीर केले. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या म्हणण्यानुसार, 13 अग्निशमन दल आणि 7 जंबो टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळी सातच्या दरम्यान आग लागली. आग लागल्यानंतर इमारतीतील सर्व दिवे गेले. बाहेर बघितले असता धुराचे लोट असल्याचे दिसले आणि आगीची माहिती मिळताच सर्वजण इमारतीच्या खाली आले. प्रत्येक मजल्यावर सहा घरे आहेत. आग लागली त्या परिसरात सुमारे 20 ते 22 रहिवासी राहत असतील. आता सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे रहिवाशांनी सांगितले.
आग विझवण्याचे काम सुरू असून या परिसरात आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोघांनाही बाहेर काढण्यात आले आहे.
दिल्लीतील वीकेंड कर्फ्यू हटणार, केजरीवाल यांनी एलजीकडे पाठवला प्रस्ताव