Diamond: नशीब असावे तर असे! शेतकऱ्याला सापडला 80 लाखाचा हिरा, रातोरात झाला श्रीमंत


Last Updated on December 13, 2022 by Piyush

Farmer found 14 carat diamond: कधी कोणाचं नशीब चमकेल सांगता येत नाही. अनमोल हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे नशीब उजळले आहे. मनोर गावचे सरपंच आणि शेतकरी प्रकाश मुझुमदार (Prakash Mazumdar) यांनी त्यांच्या पाच साथीदारांसह त्यांच्या खाजगी शेतात खाण लावली होती, त्यातून 14.21 कॅरेटचा चमकणारा हिरा (Diamond ) सापडला आहे. प्रकाश मुझुमदार यांना आतापर्यंत जवळपास 12 हिरे मिळाले असून, त्यात हा सर्वात मोठा हिरा आहे, जो त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हिरे कार्यालयात जमा केला आहे.

पन्ना जिल्हा हा हिऱ्यांची शेती असणारा जिल्हा समजला जातो. अनेकदा या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात हिरे मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पन्ना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचं (Farmer of Panna District) नशिब चमकल्याचं पहायला मिळतंय. या हिऱ्याची रक्कम ऐकून अनेकांचे डोळे उघडेच्या उघडे राहतील.

या संदर्भात सरपंच प्रकाश मजुमदार यांचे म्हणणे आहे की, हिऱ्यांच्या लिलावानंतर मिळालेली रक्कम ते समप्रमाणात वाटून त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करणार आहेत. त्याचबरोबर आगामी लिलावात हा हिरा ठेवण्यात येणार असल्याचे हिरे तज्ञ अनुपम सिंह यांनी सांगितले. हा या वर्षातील सर्वात मोठा हिरा आहे.

शेतकरी प्रकाश यांनी शेतीत काहीच फायदा होत नसल्यामुळे त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत 2019-20 मध्ये त्याच शेतात हिऱ्याची खाण सुरू केली. यानंतर एकामागून एक 11 हिरे मिळाले. यामध्ये 7.44 कॅरेट, 6.44 कॅरेट, 4.50 कॅरेट, 3.64 कॅरेट आणि काही छोटे हिरेही सापडले आहेत. प्रकाश यांनी 2022 च्या पंचायत निवडणुकीत सरपंच निवडणूक लढवली आणि जिंकली. सरपंच झाल्यानंतर प्रकाश यांना दोन हिरे मिळाले असून त्यापैकी एक 3.64 कॅरेटचा हिरा असून एक 12 डिसेंबर रोजी सापडला आहे. या हिऱ्याची किंमत 80 लाख सांगण्यात येत आहे.

वाचा : वृद्ध व्यक्तींशी रोमान्स करायची 25 वर्षाची मुलगी, कारण जाणून व्हाल थक्क