तुरीवर किडींसाठी थंडीमुळे पोषण वातावरण..! असे करा तुरीवरील किडीचे नियंत्रण


Last Updated on December 3, 2022 by Piyush

Tur Pest Management : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या अळ्यांमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता किटकशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणत तुरीची पेरणी करण्यात आली आहे. किटकशास्त्रज्ञांच्या सर्वेक्षणानुसार यावर्षी चांगला पाऊसमान असल्यामुळे तुरीचे पीक चांगले आहे. येत्या पंधरवड्यात पीक फुलोऱ्यावर येणार आहे. तुरीपासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, मागील आठवड्यातील रात्रीच्या थंड हवामानामुळे तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे.

या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापन करून उपाययोजना करावी. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये हेलीकोवर्पा ही शेंगा पोखरणारी अळी आहे.

या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले आणि शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मिमी लांब, विविध रंग छटेत दिसून येते.

यात पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाची असून तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. अळ्या शेंगाना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात. पिसारी पतंग ही अळी १२.५ मिमी लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात.

अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. बाहेर राहून दाणे पोखरते. शेंगे माशी या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते.

पक्षी थांबे लावण्याची गरज

या तीनही अळी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरिता सारखीच उपाययोजना करावी लागते. यासाठी प्रतिहेक्टर २० पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडीच्या अळ्या खाऊन फस्त करतात. अळ्यांचा प्रादुर्भाव जादा असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतात. त्या गोळा करून कराव्यात.

वाचा : थंडी वाढली अन लिंबाच्या दरात मोठी घसरण झाली