Last Updated on November 21, 2022 by Piyush
जळगाव : घरात लहान मूल असेल तर पालकांना विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा मुले खेळण्याच्या नावाखाली अशी कामे करतात की त्यांचा जीव जातो. त्यामुळे घरात लहान मुले असतील तर पालकांना त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष द्यावे लागते. मात्र तरीही मोठे अपघात वारंवार घडतात. असाच एक प्रकार जळगावमधून समोर आला आहे. ज्यामध्ये एका 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
अमळनेर शहरातील मुंदडा नगर 1 येथील रहिवासी असलेल्या 15 वर्षीय मुलाचा झोका खेळत असताना मृत्यू झाला. झोका खेळताना या मुलाचा फाशी लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वेदांत संदीप पाटील असे मुलाचे नाव आहे. वेदांतचे आई आणि वडील दोघेही शिक्षक आहेत.
हा मुलगा शहरातील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होता. घटनेनंतर त्यांना तातडीने अमळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी वेदांतला मृत घोषित केले. या घटनेनंतर वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.
वाचा : बापरे! या मुलाने 11 हजार व्होल्टच्या विजेच्या तारांवर घेतला झोका, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण