भारतात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना महामारीने दिल्लीतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) मुख्यालय ठोठावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील भाजप मुख्यालयातील ४० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीपूर्वी सोमवारी एक सामूहिक चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये 42 कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आढळले.
सूत्रांनी सांगितले की बाधितांमध्ये अनेक स्वच्छता कर्मचारी आहेत. या सर्वांना सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. मध्य दिल्लीतील मिंटो रोड येथील भाजपचे मुख्यालय नंतर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
भाजपने नवीन प्रोटोकॉल सुरू केला आहे. कोणत्याही मोठ्या बैठकीपूर्वी त्यांच्या दिल्लीतील मुख्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची कोविड-19 साठी चाचणी केली जाईल.
“फक्त कार्यालयाशी संबंधित महत्त्वाच्या कामांमध्ये गुंतलेले लोकच मुख्यालयात येत आहेत,” एएनआय या वृत्तसंस्थेने एका अज्ञात भाजप अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे. काल उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाच्या मुख्यालयात पार पडली. बैठकीची दुसरी फेरी आज होणार आहे.
बॉलिवूडमधील ‘टार्जन’ हेमंत बिर्जे यांच्या कारचा अपघात, किरकोळ जखमी