दिल्लीतील पालममध्ये माथेफेरूने केली बाप-बहिणींसह 4 जणांची चाकूने वार करून हत्या, आरोपी ड्रग ऍडिक्ट


Last Updated on November 23, 2022 by Ajay

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील पालममध्ये बुधवारी एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीला एवढा उन्माद आला की त्याने आपल्या बहिणी, वडील आणि आजीची चाकूने वार करून हत्या केली. दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही सर्व हत्या त्याने घरातच केल्याचे बोलले जात आहे.

आरोपी माथेफेरू आणि अंमली पदार्थांचे व्यसनी

पालममध्ये आपल्याच कुटुंबातील 4 जणांची हत्या करणाऱ्या आरोपीबाबत अधिक माहिती समोर आली आहे. तो वेडा आणि अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. कुठेतरी या नशेच्या आहारी गेल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. हत्येवेळीही तो दारूच्या नशेत होता. हेही वाचा: अमित शाह, नड्डा, केजरीवाल यांच्या सभांनी प्रचार फड रंगला