रेशीम शेती साठी सरकारकडून मिळणार 3.42 लाखाचे अनुदान


Last Updated on November 24, 2022 by Piyush

वाशिम: रेशीम उद्योग विकसित होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. बारमाही सिंचनाची सोय असल्यास इच्छुक शेतकरी या पर्यायाकडे वळू शकतात. रेशीम उद्योगाकरिता लागणारी सामग्री आणि कुशल, अकुशल मजुरीसाठी तीन वर्षांत ३ लाख ४२ हजारांचे अनुदान शासनाकडून दिले जाते, अशी माहिती जिल्हा रेशीम अधिकारी एस.पी. फडके यांनी दिली.

रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी सर्वप्रथम कीटकांचे खाद्य असलेल्या तुतीची शेतात लागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुती लागवड व जोपासणीकरिता शासनाकडून तीन वर्षांत ८९५ मनुष्य दिवस मजुरीपोटी २ लाख २९ हजार १२० रुपये आणि सामग्रीसाठी १ लाख १३ हजार ७८० रुपये असे एकूण ३ लाख ४२ हजार ९०० रुपये अनुदान दिले जाते.

याशिवाय नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पातून तुती रोपवाटिका, तुती लागवड, कीटक संगोपन गृह आणि संगोपन साहित्य खरेदीसाठीदेखील भरीव अनुदानाची तस्तद करण्यात आली आहे.

कोण घेऊ शकतो लाभ

अनुसुचित जाती, जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती. दारीद्रय रेषेखालील कुटूय, महिला प्रधान कुटूंब, शारिरीक अपंगत्व प्रधान कुटूंब, भुसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी कृषी माफी योजना सन २००८ नुसार अल्प भूधारक व सिमांत शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभार्थी निवडीचे निकष

लाभार्थीकडे मध्यम ते भारी व पाण्याची निचरा होणारी जमीन असावी, लागवड केलेल्या तुती क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे.

महिनाभर राबविले जाणार महा रेशीम अभियान

जिल्हा रेशीम कार्यालय, वाशिम अंतर्गत तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन ही योजना ‘मग्रारोहयोतून राबविण्यात येते. जिल्ह्यात महा रेशीम अभियान २०२३ राबविण्यात येत आहे. त्यास १५ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून १५ डिसेंबरपर्यंत ते कार्यान्वित असणार आहे.

तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादनाची योजना फायदेशीर असून शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होणे शक्य आहे. बारमाही सिंचनाची सोय असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्याकरिता संपर्क साधावा. – एस.पी. फडके, जिल्हा रेशीम अधिकारी, वाशिम.

वाचा : टोमॅटोची लाली उतरली, दरात घसरण