नाशकात चोरट्याकडून १६ मोटरसायकली हस्तगत


Last Updated on December 21, 2022 by Vaibhav

जुने नाशिक : भद्रकाली पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाने सुमित पुंडलिक पैठारी ( वय २८, रा. एन-५१ / एडी ८/५/१, पवननगर, सिडको) यांनी त्यांची ३५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल (एमएच १५ डीक्यू ४१३०) वावरे लेन, मेन रोड परिसरात पार्क करून कामानिमित्त गेले असता, अज्ञात चोरटयाने ती चोरून नेली.

याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अंमलदार धनंजय हासे व सागर निकुंभ यांनी सापळा रचून संशयित हेमं रमेश सोनवणे (वय ३५, रा. फोपीर, ता बागलाण, जि. नाशिक) यास ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. तसेच, नाशिव शहरातील इतर भागांतूनही मोटरसायकल चोरल्याचे त्याने सांगितले.

त्याच्याकडून आठ लाख रुपये किमतीच्या तब्बल १६ मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्य आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार गुन्हे शोध पथकाचे किशोर खांडवी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते लक्ष्मण ठेपणे, रमेश कोळी, संदीप शेळके- कय्युमअली सैयद, विशाल काठे, साग निकुंभ, धनंजय हासे, संजय पोटिंदे, निती भामरे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात घड्याळाचा गजर