पीएमएवाय योजनेंतर्गत वसई- विरार स्टेशनजवळ घरांचा बंपर धमाका..! 1 bhk Flat in Mumbai

मुंबई : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत म्हाडाने वसई येथे सुरक्षा स्मार्ट सिटी या सहकारी खासगी भागीदारी तत्त्वावर आधारित निवासी प्रकल्प दाखल केला आहे. या प्रकल्पांमध्ये अत्यल्प ४५ हजार १०२, तर अल्प उत्पन्न गटात ३० हजार ८२९ सदनिका (1 bhk Flat in Mumbai) उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेतील घरांसह कोकण मंडळाच्या घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे.

केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करताना म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यानुसार कोकण मंडळांतर्गत म्हाडाने करार केला असून सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प दाखल केला आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

वसई-विरार शहर महानगरपालिके अंतर्गत या प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली असून प्रकल्पासाठी पीएमएवान योजनेंतर्गत २.५ एफएसआय देण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ७५ हजार ९८१ सदनिका उभारण्यात येणार असून त्यापैकी ४५ हजार १०१ अत्यल्प उत्पन्न गट व ३० हजार ८२९ अल्प उत्पन्न गटाचा समावेश आहे. तर पीएमएवाय योजनेंतर्गत यापैकी म्हाडाला २७ हजार अत्यल्प व १७ हजार अल्प उत्पन्न गटातील घरे उपलब्ध होणार आहेत. तर विकासकांना १८ हजार १७२ अत्यल्प व १३ हजार ८२९ अल्प उत्पन्न गटातील घरे उपलब्ध होणार आहेत.

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

म्हाडा अंतर्गत घरांसाठी २२ लाख ५० हजार रुपये रक्कम ठरवण्यात आली असून अत्यल्प उत्पन्न गटाच्या तरतुदीनुसार २.५ लाख रुपये अनुदान मिळणार आहे व १ हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षा सिटी योजनेंतर्गत वसईत अत्यल्प उत्पन्न गटाची घरे १९ लाख ९९ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध होणार आहेत.

वाचा : आता संधी सोडू नका..! 15 ऑगस्टला सिडकोची 8 हजार घरांची लॉटरी । Flats in mumbai

ठरवून देण्यात आलेल्या घरांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत कमी असून परवडणाऱ्या दरातील या घरांसाठी सर्वसामान्यांचा मागील सहा महिन्यांतील प्रतिसाद उत्तम असल्याचे विकासकांनी स्पष्ट केले आहे. हा प्रकल्प वसई रेल्वे स्थानकापासून अवघ्या १.४ किमीवर असून नायगाव तसेच एनएच-४८ या ठिकाणांपासून मध्यवर्ती असल्याचे सांगण्यात आले आहे.

वाचा : सिडकोचे लॉटरी पूर्वीच घर घेताय तर सावधान । 2 Bhk Flat In Navi Mumbai

1 bhk Flat in Mumbai

या प्रकल्पाची नोंदणी surakshasmartcity.com या संकेतस्थळावर सुरू असून नोंदणीच्या वेळेस ५ हजार व ७५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. ग्राहकांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच सोडतीच्या माध्यमातून घरांचा ताबा देण्यात येणार असल्याचे सुरक्षा स्मार्ट सिटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वाचा : नवी मुंबईत सिडकोचे सी व्यू अपार्टमेंट..! पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती । Sea facing flats in mumbai

Leave a Comment